गिट्टिखदान पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात…

नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि (२४) चे संध्याकाळी ७.३० वा..चे दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांचे पथक पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, नविन काटोल नाका ते दाभा चौक दरम्यान, हॉटेल यारानाचे विरूध्द बाजुचे रोडवर एक काळया रंगाची होन्डा सिटी कार क्र. एम. एच ०१ एन. ए ३१३६ ही संशयीतरित्या ऊभी दिसल्याने पोलिसांनी गाडीजवळ जावुन पाहणी केली असता गाडी मध्ये एकुण ५ ईसम दिसुन आले.





त्यांना गाडीबाहेर बोलाविले असता ते वाद-विवाद करू लागले. तेवढयात दोन ईसम खाली उतरून पळुन गेले. तिन ईसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) राहुल उर्फ चाटी राजु तडस, वय २७ वर्ष, रा. पिटी कन्या
विद्यालय जवळ, वरूड, जि. अमरावती २) फैजल खान वल्द महेमुद खान पठान वय २५ वर्ष रा. केदार चौक,वरूड, जि. अमरावती ३) केशव शिवप्रकाश हुडमारे वय २३ वर्ष रा. आठवडी बाजार चौक, वरूड, जि. अमरावती असे सांगीतले.त्यांचेवर संशय बळावल्याने



त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एक स्टीलचा चाकु, एक लोखंडी तलवार, बेसबॉलचा लाकडी दांडा, मिरची पावडर, दोरी, असे साहीत्य मिळुन आले. आरोपी हे त्यांचे पळुन गेलेले साथिदार ४)वसीम शाह वल्द शौकत शाह वय ३२ वर्ष रा. नया डायरा, वरूड, जि. अमरावती ५) बाबु चिनी नावाचा इसम रा.
जगदीश नगर, नागपूर यांचेसह संगणमत करून प्राणघातक शस्त्र घेवुन कुठेतरी दरोडा टाकण्याचे तयारीत असताना  मिळुन आले. आरोपींचे ताब्यातुन वरील साहित्यासह आयफोन व विव्हो असे दोन मोबाईल फोन, रोख २,७००/- रू व चार चाकी होन्डा सिटी कार क्र. एम. एच ०१ एन. ए ३१३६ असा एकुण अंदाजे २,४३,४००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपींचे कृत्य हे कलम ३९९, ४०२ भा.दं.वि., सहकलम ४, २५ भा. ह. का., सहकलम १३५ म.पो. का. अन्वये होत असल्याने आरोपींविरूध्द पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त परीमंडळ २ राहुल मदने यांचे  मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस  स्टेशन गिट्टीखदान विनोद कालेकर ,पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र बोबडे,सहा पोलिस निरीक्षक चेतन बोरखडे,पोहवा बलजित ठाकुर,अजय यादव,ईशांक आटे,नापोशि विशाल नांदेकर,पोशि आकाश लोथे,सचिन खडसे,नागनाथ कोकरे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!