
हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करुन मुद्देमाल केला हस्तगत…
हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस घेतले ताब्यात….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(२७)जुलै चे रात्रीदरम्यान पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १४, बेलदारनगर, नरसाळा रोड, नागपूर येथे राहणारे शुभंम महेन्द्र बोकडे, वय ३० वर्षे यांचे त्यांचे घरा समोर टाईमब्रेक ई- स्पोर्टस, लाऊंज गेमींग झोन नावाचे दुकान आहे ते रात्री बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे दुकानातील मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक्स बॉक्स सिरीज सिस्टम, सोनी कंपनीचे
पीएस ५ चे तिन सिस्टम, सोनी कंपनीचा एक व्हीआर जुवा, पि.सी.यू. सि.पी. यू व रिमोर्ट असा एकुण किंमती अंदाजे
३,२०,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या. सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हयाचे तपासात हुडकेश्वर पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून संशयीत जयेश मोरेश्वर सतीकोसरे वय २१ वर्ष रा. प्लॉट नं. ११, राधाकृष्ण नगर, वाठोडा, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने नमुद चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन व्हीडीयो गेमचे चोरीस गेलेले साहित्य व एक हिरो कंपनीची मेस्ट्रो मोपेड गाडी असा एकुण किंमती अंदाजे ३,२०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,अपर पोलिस आयुक्त दक्षिण विभाग शिवाजी राठोड,पोलिस उपायुक्त (परि. क्र. ४)विजयकांत सागर,सहा. पोलिस आयुक्त (अजनी विभाग)विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. ज्ञानेश्वर भेदोडकर, पोउपनि माधव गुंडेकर, सफौ. शैलेष ठवरे, नंदकिशोर तायडे, पोहवा.गणेश बोदरे, नापोशि. राजेश मोते, राजेश धोपटे, मुकेश कन्नाके पोशि. मयुर सातपूते, नितेश कडु, हिमांशू पाटील,
कुणाल उके व मपोहवा. शारदा भेरे यांनी केली.



