
संशयितांना ताब्यात घेऊन प्रतापनगर पोलिसांनी उघड केले वाहनचोरी तसेच घरफोडीचे गुन्हे….
संशयितांनी ताब्यात घेऊन प्रतापनगर पोलिसांनी उघड केले वाहन चोरी व घरफोडी सह ६ गुन्हे……
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(२८) जुलै २०२४ चे रात्री ८.३० वा. ते ९.३० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉट नं. ८७, भाऊसाहेब सुर्वे नगर, प्रतापनगर, नागपूर येथे राहणारे अजय माणिकराव वायगावकर वय ६० वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल क्र. एम. एच ३१ बि.व्ही ३७९५ किंमत १०,००० /- रु घरा समोर लॉक करून पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे वाहन चोरून नेले यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे प्रतापनगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्यां.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हयाचे तपासात प्रतापनगर पोलिसांना पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून संशयीत १) आदित्य राजेन्द्र राहंडाले वय २१ वर्ष रा. जयवंत नगर, हनुमान मंदीर जवळ, सोनेगाव,नागपूर २) करण विनोद बुलकुंडे वय १९ वर्ष रा. फुलमती ले-आउट, अजनी, नागपूर ३) कुणाल देवेन्द्र शर्मा वय
१९ वर्ष रा. ओमकार नगर, अजनी, नागपूर ४) सुजल राकेश ढाले वय १९ वर्ष रा. पंच्याशी प्लॉट, रमानगर, अजनी,नागपूर यांना निष्पन्न करुन ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली असता, त्यांनी सदरची चोरी केल्याचे कबुल केले तसेच अधिक सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीतुन १ वाहन चोरी व १ घरफोडीचा गुन्हा, पोलीस ठाणे अजनी हद्दीत २ घरफोडीचे गुन्हे, पोलिस ठाणे सोनेगाव हद्दीत १ घरफोडीचा गुन्हा केल्याचे सांगीतले. त्यानुसार आरोपींकडुन एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणुन आरोपी कडुन दोन मोटरसायकल, सोन्या-चांदीचे दागिने, टि.व्ही, लॅपटॉप असा एकुण ३,७०,८००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल सहपोलिस आयुक्त शिवाजीराव राठोड,पोलिस उप आयुक्त (परि. क्र. १) अनुराग जैन, सहा. पोलिस आयुक्त (सोनेगाव विभाग) सतिशकुमार गुरव,यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि महेश सांगडे, सपोनि. अमोल तांबे, पोउपनि संतोष राठोड, पोहवा. दिनेश भोगे, एकनाथ पाटील, निलेश तरायकर, पोअं. अंकुश कनोजिया, ऍलेक्सझेंडर डिकुज, आनंद कबालीया, गजानन जहीरराव, अतुल
राठोड यांनी केली.



