जास्त पैशांचे आमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करुन घेणारे सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात…
पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापार करवुन घेणारे सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात…
नागपुर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (05) ॲागस्ट 2024 रोजी सामाजिक सुरक्षा शाखेस गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे. सदर हद्दी मध्ये हॉटेल दुआ कॉन्टीनेंटल, पाटणी ऑटोमोबाईल समोर कामठी रोड येथे देहविक्रीचा व्यवसाय चालतो अशा खात्रीशीर माहीती वरीष्ठांना देऊन सदर हॅाटेलवर छापा टाकला असता त्याठिकाणी 1)अल्का इंद्रजित हेडाऊ वय 28 वर्ष रा. हाऊस नं. 46, खडकाडी मोहल्ला सुभाष चंद्र हॉस्पीटल जवळ तहसिल, नागपुर 2) इंद्रजित जगदिश हेडाऊ वय 36 वर्ष रा. हाऊस नं. 46, खडकाडी मोहल्ला सुभाष चंद्र हॉस्पीटल जवळ तहसिल, नागपुर हे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना तसेच महिलांना भरपुर पैशाचे आमिष दाखवुन त्यांचे आर्थिक परिस्थिचा फायदा घेवुन त्यांना देहव्यापारास प्रवृत्त करुन ग्राहकांना समागमा करीता हॉटेल मधे उपलब्ध करुन देवुन त्यांचे कडून देहव्यापार करवुन घेतात.
सदर ठिकाणी 02 पिडीत मुली/महिलांची सुटका करण्यात आली. यातील आरोपींनी पिडीतांना अधिक पैशाचे आमीष दाखवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले. वरून यातील आरोपीला ताब्यात घेऊन व त्याचे कडुन एकुण 28,430/-रू. चा मुद्देमाल जप्ती पत्रीका प्रमाणे जप्त केले असुन आरोपींतां विरूध्द पोलिस ठाणे सदर, नागपूर शहर येथे अप.क्र. 506/2024 कलम 143, 3 (5) भान्यास सहकलम 4, 5, 7, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), निमीत गोयल, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे), डॅा अभिजीत पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा शाखेच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर, पोहवा सचीन बढिये, पोहवा प्रकाश माथनकर, पोहवा लक्ष्मण चौरे, नापोशि अजय पौनीकर, शेषराव राऊत, पोशि अश्विन मांगे, समिर शेख, नितीन वासने, कुणाल मसराम, मपोहवा लता गवई, चालक पोशि कमलेश क्षिरसागर यांचेसह करण्यात आली.