हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनीट २ चा मध्यरात्री छापा…
हायप्रोफाईल ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या अड्डयावर गुन्हे शाखा युनीट १ चा मध्यरात्री छापा,१२ जुगारींसह २१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१३) चे रात्री ०२.०० वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट क्र. २ पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पिटेसुर वस्तीच्या मागे, बेग फार्म हाऊस जवळील मोकळया जागेत, गिट्टीखदान, नागपूर येथे काही ईसम टेंट टाकुन तयार केलेल्या तात्पुरत्या रूममध्ये जुगार खेळत आहे.
अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घटनास्थळी छापा कारवाई केली असता, तेथे आरोपी १) सुनिल रम्मू पटेल, वय ४० वर्ष रा. महालक्ष्मी नगर, गोरेवाडा, नागपूर २) किशोर मधुकरराव मेघरे वय ५३ वर्ष रा. अखाडा चौक, वर्धा रोड, सोमलवाडा, नागपूर ३) रंजीत त्र्यंबकराव राऊत वय ५४ वर्ष रा. पंचशील नगर,
गिट्टीखदान, नागपूर ४) मयुर गंगाधर ठवरे वय ३६ वर्ष रा. हिवरी नगर, नंदनवन, नागपूर ५) संजय गजानन मोहरले वय ४७ वर्ष रा. रामबाग, ईमामवाडा, नागपूर ६) हरिश रामदास खिलवानी वय ५६ वर्ष रा. एमआयजी कॉलोनी, जरीपटका, नागपूर ७) धरमपाल शिवराम धमके वय ४२ वर्ष रा. राहुल नगर, सोमलवाडा, नागपूर ८) घनश्याम चेतनदास साधवानी वय ५१ वर्ष रा. दिया अपार्टमेंट, जरीपटका, नागपूर ९) सौरभ राधेश्याम बावणे वय २१ वर्ष रा.
मस्कासाथ, संभाजी कासार राम मंदीर जवळ, पाचपावली, नागपूर १०) नविन सुरेश गौर वय २९ वर्ष रा. हंसापूरी,लोधीपूरा, गणेशपेठ, नागपूर ११) हितेश फुलचंद्र करवाडे वय ३४ वर्ष रा. जुना बगडगंज, कुभार टोली, लकडगंज, नागपूर १२) सुधिर भाऊरावजी धुमाळे वय ३५ वर्ष रा. गोरेवाडा जुनी वस्ती, नागपूर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ताशपत्त्याचा जुगार खेळतांना प्रत्यक्ष मिळुन आले.
नमुद जुगार अड्डया बाबत विचारपूस केली असता सदरचा जुगार
अड्डा हा फरार असलेला आरोपी क्र. १३) गणेश उर्फ घुई आनंदराव चाचेरकर वय ३५ वर्ष रा. गोरेवाडा, नागपूर हा चालवीत
असल्याचे समजले. आरोपींचे ताब्यातुन व डावावरून नगदी १,०३,८०० /- रू दोन चार चाकी वाहने, आठ दुचाकी वाहने, एक जनरेटर व ९ नग मोबाईल फोन असा एकुण २१,४३,०००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला ते जप्त करण्यात आला असुन सर्व आरोपींना ताब्यात घेवुन, त्यांचेविरूध्द पोलिस ठाणे गिट्टीखदान येथे कलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करून आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता गिट्टीखदान पोलिसांचे ताब्यात
देण्यात आले आहे
सदरची कामगिरी.पोलिस आयुक्त नागपूर शहर डॅा रविंद्र सिंघल, सह. पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) निमीत गोयल, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा) डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ च्या वरीष्ठ महीला पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, सपोनि. गजानन चांभारे, पोउपनि राऊत, पोहवा. शैलेष जांभुळकर, महेन्द्र सडमाके, दिपक चोले, नापोशि अर्जुन यादव, दिनेश डवरे, संदीप चंगोले, सुनिल कुवर, प्रविण शेळक पोशि. संदीप पांडे, आशिष धंदर, प्रविण चव्हाण यांनी केली.