
नागपुर शहर गुन्हेशाखा युनिट ३ ने अग्णीशस्त्रासह एकास घेतले ताब्यात…
अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट ३ ने घेतले ताब्यात….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. (०७)रोजी रात्री चे ००.०१ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, एक ईसम अवैध शस्त्र बाळगुन आहे यावरुन सदर ईसमाबाबत चौकशी केली असता तो १) सय्यद अरशद अली उर्फ राजा डवका वय २५ वर्ष रा. भालदारपूरा, नागपूर हा होता त्यास शस्त्राबाबत विचारपुस केली असता ते त्याच्या सोबत असक्णारा परंतु फरार २) फैजान समीउल्ला खान वय ३० वर्ष रा. बजेरीया, नागपूर यांचे जवळ पिस्टल असले बाबत माहिती मिळाली


यावरून त्यांनी आरोपी क्र. १ सय्यद अरशद अली उर्फ राजा डवका याच्या दिलेल्या पत्यावर शोध घेवुन ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता, त्याने सदर पिस्टल त्याचा मित्र आरोपी क्र.२ फैजान समीउल्ला खान वय ३० वर्ष रा. बजेरीया, नागपूर याचे कडे ठेवलेली असल्याचे सांगीतले. आरोपी क्र. १ यास सोबत घेवुन सध्या राहत
असलेल्या आरोपी क्र. २ याचे घरी पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. २५७, राधाकृष्ण नगर, गिड्डोबा चौक, येथे गेले असता आरोपी क्र. २ मिळुन आला नाही. यावरून आरोपी क्र. १ याने आरोपीचे क्र. २ चे घरातुन एक लोखंडी देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह किंमती अंदाजे एकुण ४०,००० /- रू चा मुद्देमाल अवैधरित्या बाळगतांना मिळुन आला. आरोपीचे ताब्यातुन वर नमुद मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई कामी वाठोडा पोलिसांचे
ताब्यात देण्यात आले. तसेच आरोपी क्र. १ याचा अभिलेख तपासला असता तो पोलिस ठाणे वाठोडा, तहसिल व गणेशपेठ येथुन मागील आठ महिन्यापासुन गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे समजले.
आरोपी हा गुन्हा करण्याचे उद्देशाने अग्नीशस्त्रासह समक्ष मिळुन आल्याने तसेच, त्याने सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलिस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३ / २५ भा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा होत असल्याने गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त जमा रविंद्रकुमार सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ३ चे पोलिस निरीक्षक. मुकूंद ठाकरे, पोउपनि मधुकर काटोके, सफौ. सतिश पांडे, दशरथ मिश्रा, पोहवा. विजय श्रीवास,पोशि दिपक लाकडे, जितेश रेड्डी, दिपक दासरवार व विशाल रोकडे यांनी केली.



