विक्रीकरीता गोंमास तस्करी करणारे यशोधरानगर पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

विक्री करीता गोवंशीय मांस वाहतुक करणारे यशोदानगर पोलिसांनी केले जेरबंद….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२४) सप्टेंबर २०२४ चे रात्री यशोधरानगर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करत असतांना रात्री ०१.४५ वा. चे सुमारास, पथकास खात्रीशीर माहीती मिळाली की, कामठी येथुन ट्रक क. एम.एच ३४ ए.बी ९३५८ मध्ये अवैधरित्या गोवंशीय मांस नागपूरचे दिशेने येत आहे.





अशा माहितीवरून पोलिस ठाणे हद्दीत सापळा रचुन, असलेल्या शारदा कंपनीचे समोरील कामठी रोडवर, नमुद वर्णनाचा ट्रक येतांना दिसला त्यास थांबवुन त्याची पाहणी केली असता ट्रकचे मागील डाल्यामध्ये अंदाजे १५,००० किलो गोमांस किंमत अंदाजे १५,००,०००/- रू. चे गोवंशीय मांस मिळुन आले. त्यामधील वाहन चालक व त्याचा साथिदार आरोपी क्र १) सय्यद हारून सय्यद सरीद वय ३८ वर्ष रा. भाजी मंडी, सय्यद बाबाचे दर्गा जवळ, कामठी, जि. नागपूर २) समीर खान शब्बीर खान वय ३७ वर्ष रा. भाजी मंडी वैद्य किराणा स्टोअर्स जवळ, कामठी जि. नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, सदर मांस हे पाहिजे असलेला आरोपी क्र ३) जिया कुरैशी रा. भाजी मंडी, कामठी नागपूर व ४) ट्रकचा मालक रिजवान हाजी रा. भांजी मंडी, कामठी, नागपूर यांचा असल्याचे सांगीतले.



आरोपींचे ताब्यातुन गोवंशीय मांस व ट्रक असा एकुण किंमती २७,००,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरूध्द सर. तर्फे फिर्यादी पोलिस शिपाई गोकुळ पवार यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलिस ठाणे यशोधरानगर येथे कलम ३२५, ४९, ३(५) भा.न्या.सं., सहकलम ५ (अ), ५ (ब), ९, ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९९५, सहकलम ११(१) (घ) (ड) (च) प्राणी कुरता अधिनियम-१९६०, सहकलम ८३, १७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क्र. १ सय्यद हारून सय्यद सरीद आरोपी क्र २) समीर खान शब्बीर खानलयांना अटक केली असुन. पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे पोलिस उपायुक्त(परीमंडळ ५) निकेतन कदम,सहा पोलिस आयुक्त (जरीपटका विभाग)विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि रमेश खुले व तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!