कुख्यात गुंड पंकज यास पोलिस आयुक्तांचे आदेशाने केले स्थानबध्द…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कुख्यात गुंड गौरव उर्फ पंकज रगडे यास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये केले स्थानबध्द…

नागपुर(प्रतिनिधी) – नागपुर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २८/१२/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस स्टेशन
अजनी व कोतवाली नागपूर शहरचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे गौरव वल्द पंकज रगडे, वय २४ वर्षे, रा. कुंजीलालपेठ, गल्ली नं. ०२, मानवता हायस्कुल मागे, पोलीस ठाणे अजनी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८९ अंतर्गत दिनांक २८/१२/२०२३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. २८/१२/२०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
गौरव उर्फ पंकज रगडे, याचेविरूध्द पोलिस स्टेशन अजनी व कोतवाली नागपूर शहर येथे प्राणघातक शस्त्रासह गैरकायदयाची मंडळी जमवुन खुन करण्याचा प्रयत्न करणे, फौजदारी कट रचणे, चोरी करणे, प्राणघातक शस्त्राने आपखुशीने दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, एखादया व्यक्तीस मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालुन खंडणी मागणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह – अतिक्रमण करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे इत्यादी मालमत्तेविरूध्दचे
तसेच शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०२९ व २०२२ मध्ये अजनी पोलीसांकडून त्याच्याविरूध्द ११० (ई), (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याचेवर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याने गैरकायदेशीर व धोकादायक गुन्हे करण्याची प्रवृत्ती निरंतर सुरूच ठेवली होती





अलीकडील काळात त्याने पोलिस ठाणे अजनी हद्दीत आपखुशीने दुखापत करणे, अश्लील शीवीगाळ करणे, आपराधीक जीवे ठार
मारण्याची धमकी देणे, एखादया व्यक्तीस मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालुन खंडणी मागणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे गौरव उर्फ पंकज रगडे याची अपराधीक कृत्ये असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक, पोलीस स्टेशन,अजनी नागपूर शहर यांनी
नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम. पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलिस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता, त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ठेवण्यात आले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!