
यवतमाळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपीस,नागपुर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने नागपुर येथुन घेतले ताब्यात….
नागपुर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात व फरार आरोपीस केली अटक,माहीती देणार्यास यवतमाळ पोलिसांनी बक्षीस केले होते जाहीर…
नागपुर (शहर प्रतिनिधी) –नागपुर गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा पथकाने पोलिस ठाणे लोहारा जि.यवतमाळ हद्दीतील अनेक गंभीर तसेच खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या फरार आरोपीचा कौशल्यपूर्ण तपास, मिळालेली गोपनीय माहिती अन् तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी – शाम सुभाष जोगदंड (वय 28 वर्षे) रा.नेताजी नगर दारव्हा रोड, यवतमाळ याला शिताफीने ताब्यात घेऊन लोहारा, अवधूतवाडी आणि यवतमाळ, पोलिस ठाण्यातील 18 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून अप क्र. 214/2024 कलम. 302,504,506,34 भादवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या बाबत थोडक्यात माहिती अशी की, नमूद आरोपीने वैयक्तिक कारणावरून हेमंत कामडे याची धारदार शास्त्राने (दि. 02जून) रोजी हत्या करून नमूद गुन्ह्यात पाहिजे असल्याने पोलिस ठाणे लोहारा येथून जाहीर आवाहन प्रसारित करण्यात आले होते. जो कोणी या फरार आरोपीची माहिती देईल त्याला बक्षीस देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल आणि त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. शेवटी सदर आरोपीस मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मोठा ताजबाग येथून ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे काबुल केल्याने तसेच तो पोलिस ठाणे लोहारा येथून 2 वर्षाकरीता हद्दपार केले आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पोलिस ठाणे लोहारा यांचे ताब्यात देण्यात आले आहे व पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन अजनीरे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाच्या मपोनि. कविता ईसारकर, पोहवा. सचिन बढीये, लक्ष्मण चौरे, नापोशि अजय पौनिकर, शेषराव राऊत, अश्विन मांगे, पोशि कुणाल मसराम, समिर शेख, प्रकाश माथनकर, नितीन वासने व मपोअं. पुनम शेंडे यांनी केली.



