विनापरवाना देशी-विदेशी दारुचा साठा करणारा सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात…
अवैधरित्या विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास नागपुर गुन्हे शाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाने केले जेरबंद,आरोपींसह देशी विदेशी दारुचा साठा केला जप्त….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१२)ॲाक्टोबर २०२४ चे रात्री गुन्हेशाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे इमामवाडा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की प्लॉट नं. ४९८/अ, चंदन नगर, नागपूर ऑटो वर्क समोर, ईमामवाडा येथे काही ईसम अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करताय
यावरुन सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता, त्या ठिकाणी मोहम्मद हुसैन दिन मोहम्मद शेख वय ६१ वर्ष रा. प्लॉट नं. ५१, चंदन नगर, नागपूर हा आपले ताब्यात अवैधरित्या विनापरवाना रॉयल स्टॅग कंपनीचे १६ बॉक्स, विदेशी दारू एकुण ७६८ बॉटल, १८० एम.एलच्या किंमती १,४५,९२०/- रू. तसेच टुबोर्ग बिअरचे १४ बॉक्स ६५० एम.एलच्या १६८ बॉटल किंमती ३२,७६०/- रू. व देशी दारू संत्रा भिंगरीचे ४ बॉक्स १८० एम.एलच्या १९२ बॉटल किंमती १३,४४०/- रू. चा मुद्देमाल विक्री करीता बाळगतांना मिळुन आला.
त्याचे जवळुन दारू विकीचे ११३०/- रू. व मुद्देमाल असा एकुण किंमती अंदाजे १,९३,२५०/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द पोलिस ठाणे ईमामवाडा येथे कलम ६५ (ई) महा. दा. का अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल,सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील पोलिस उपायुक्त(डिटेक्शन)राहुल माकणीकर, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे) अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा शाखेच्या मपोनि. कविता ईसारकर, नापोशि शेषराव राऊत, अश्विन मांगे, समीर शेख, नितीन वासने, कुणाल मसराम, मपोहवा. आरती चव्हाण व पुनम शेंडे यांनी केली.