
एटीएम मधुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी नागपुर गुन्हेशाखा युनिट ४ ने केली जेरबंद, एकुण ०४ गुन्हे केले उघड…
एटीएम मधुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी नागपुर गुन्हेशाखा युनिट ४ ने केली जेरबंद, एकुण ०४ गुन्हे उघडकीस…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसात नागपुर शहरात विविध बँकेचे एटीएम मशीनला पट्टी लावुन कोणीतरी अज्ञात आरोपी चोरी करित आहे त्याअनुषंगाने विविध पोलिस ठाणे सक्करदरा, नंदनवन, हुडकेश्वर, जुनी कामठी हद्दीतील ए.टी.एम. मधुन चोरी झाल्याने तेथे अनोळखी आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३२४ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले होते.


दाखल गुन्हयाचे तपासात गुन्हेशाखा युनिट ४ ने सि.सी.टी.व्ही फुटेजचे आधारे तांत्रीक तपास करून व गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून आरोपी १) अतुल विश्राम पाल, वय १९ वर्षे, २) रोहीत बहादुरसिंग, वय २४ वर्षे, दोन्हीही रा. तारापुर बाजार, तह. लालगंज अजरा, जि. प्रतापगढ (उत्तरप्रदेश) यांना निष्पन्न करुन ताब्यात घेतले हे त्यांचे ईतर साथीदारांना माहीती पडल्याने ते पळुन जात असल्याचे माहीतीवरून समृध्दी महामार्गाने त्यांचा पाठलाग करून धामनगांव रेल्वे येथे आरोपी क. ३) शिवमुर्त रामखिलवान पाल, वय २४ वर्षे, रा. रामनगर चौराह, तह. कुंडा, जि. प्रतापगढ (उत्तर प्रदेश) यांस चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले.

ईतर दोन साथीदार पसार झाले. आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. आरोपींचे ताब्यातुन रोख २८,५००/- रू., तिन मोबाईल फोन व एटीएम मध्ये पैसे अडविण्याकरीता वापरण्याच्या पट्टया, आय २० चार चाकी वाहन असा एकुण ५,५८,३००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी सक्करदरा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन),राहुल माकणीकर सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट ४ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रमेश टाले,पोउपनि वैभव बारंगे,पोहवा पुरुषोत्तम जगनाडे, युवानंद कडू,नाजीर शेख, सतीश ठाकरे, सुनील ठवकर,नापोशि नितीन वर्मा पोशि महेश काटवले सायबर सेल चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.


