
संशईतास ताब्यात घेऊन मानकापुर पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…
संशईतास ताब्यात घेऊन मानकापूर पोलीसांनी दुचाकी चोरीचे तीन गुन्हे केले उघड…
मानकापुर(नागपुर शहर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्कर व्रुत्त असे की, दि १९ नोव्हेंबर.२०२४ चे संध्याकाळी ६.०० वा. ते ६.३० चे दरम्यान, फिर्यादी आदील खान जुबेर खान, वय २७ वर्ष, रा. भानखेडा, तहसिल, नागपूर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्रो गाडी कं. एम.एच ४९ ए.ए ६५०२ किंमत अंदाजे ४०,०००/- रू. ची, मॅक्स हॉस्पीटल समोर, कोराडी रोड, फुटपाथवर पार्क करून, लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलिस ठाणे मानकापूर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हयाचे तपासात मानकापूर पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून रमेश उर्फ रोहीत गुणाराम चंद्रपूरी, वय ३३ वर्ष, रा. मोठार, ता. उमरेड, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश यास निष्पन्न करुन ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद दुचारी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी गेलेली मोटरसायकल किंमती अंदाजे ४०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली. आरोपीची अजुन सखोल विचारपूस केली असता, आरापीने पोलिस ठाणे मानकापूर हद्दीत तसेच प्रतापनगर हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरापीचे ताब्यातुन स्प्लेंडर क. एम.एच ४९ एस ७९६२ किंमती ५०,०००/- रू. ची व काळया रंगाची होन्डा शाईन क. एम.एच ३१ एफ.डी ७६१६ किंमती ५०,०००/- रू. ची तसेच प्लेझर गाडी क्र. एम.एच ३१ बी.ई ३५५९ किंमत ५०,०००/- रू. ची, अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ ए.डी १३६१ किंमत ५०,०००/- रू. ची व एक विना नंबर प्लेट असलेली स्प्लेंडर गाडी किंमत ५०,०००/- रू. ची असा एकुण किंमत २,९०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल,सह पोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त (उत्तरविभाग) प्रमोद शेवाळे, पोलिस उपायुक्त(परीमंडळ २) राहुल मदने,सहा पोलिस आयुक्त (सदर विभाग) सुनिता मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली मानकापुर पोलिस स्टेशनच्या वपोनि. मनिषा वरपे, पोउपनि. अमीत देशमुख, पोहवा. राजेश बरणे, राहुल गवई, नापोअं. विपीन रक्षे, मिलींद नासरे व प्रशांत खंडारे यांनी केली.



