
संशयीतांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा…
नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना शिताफीने घेतले ताब्यात…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत कळमणा रोड, कामठी, लाईफ लाईन हॉस्पीटल येथे राहणारे फिर्यादी डॉ. तमीम फाजील मुक्तार अहमद, वय ४३ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन दि(२५) मे पासुन परिवारासह मनाली येथे फिरायला गेले होते, हॉस्पीटलचे रिशेप्शनीस्ट यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की,दि.(३०) चे पहाटे. चे दरम्यान, वार्डबॉय हा सिलेंडर ठेवण्याकरीता जात असता
त्याला शिडीवरून दोन ईसम पळतांना दिसले तसेच ईतर दोन ईसम झाडा-झुडपात लपलेले दिसले. फिर्यादी हे दि.(३१)मे रोजी घरी परत आले व पाहणी केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप न तुटल्याने आरोपींनी टेरेसवर जावुन टेरेसवरील दार तोडुन घरात प्रवेश करून बेडरूमधील आलमारीचे लॉकर तोडुन त्यामधील रोख १३,४४,००० /- रू चोरून नेले.


फिर्यादी डॉ. तमीम फाजील मुक्तार अहमद,यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे नविन कामठी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५७, ३८०, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात कामठी पोलिसांनी तांत्रीक तपास करून व गुप्त बातमीदाराचे माहिती वरून गुन्हयातील मास्टर माईंड आरोपी मोहम्मद अकरम उर्फ दादा वल्द जमील अख्तर अंसारी वय ५० वर्ष रा. बुनकर कॉलनी, कळमणा हा असल्याचे निष्पन्न केले. फिर्यादीचे घरी मोठी रक्कम असल्याची टिप असल्याने त्याने त्याचे साथीदार ईतर आरोपी यांना बोलावुन घरफोडीचा प्लॅन तयार केला होता. कामठी पोलिसांनी आरोपींचा शोध घेवुन आरोपी क्र. ०१)
खलील अहेमद कदीर अहेमद वय ५३ वर्ष रा. वारीसपुरा, दरोगा मस्जीद, जवळ, कामठी २) अंकीत प्रकाश शेवते वय ३२ वर्ष रा. चंपा आश्रम मागे, वारीसपुरा, कामठी, ३) कलीम खान ईब्राहीम खान वय ३४ वर्ष रा. नालसाहब चौक, मोमीनपुरा, नागपुर, ४) आकाश उर्फ अतुल राजकुमार मिश्रा वय २५ वर्ष रा. कॉटन मार्केट, उदापुरे ज्वेलर्स समोर, गणेशपेठ, नागपुर यांना नमुद गुन्हयात अटक केली असुन पाहीजे असलेला आरोपी मास्टर माईंड मोहम्मद अकरम उर्फ दादा वल्द जमील अख्तर अंसारी वय ५० वर्ष याचा शोध सुरू आहे.

अटक आरोपींचे ताब्यातुन रोख १,९८,००० /- रू ४ मोबाईल फोन, स्प्लेंडर मोटर सायकल क्र. एमएच ४० बीएक्स ३३५८, व काळया रंगाची व स्प्लेंडर प्लस एमएच ४० बीझेड ४०९२ असा एकुन ३,००,००० / रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नागपुर डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोर्जे,अप्पर पोलिस आयुक्त (उत्तर विभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त (परी ५)निकेतन कदम,सहायक पोलिस आयुक्त कामठी विभाग विशाल क्षिरसागर
यांचे मार्गदर्शनाखाली नवीन कामठी पोलिस स्टेशनचे वपोनि. प्रमोद पोरे, सपोनि सचीन यादव, पोहवा. विशाल देवगडे, खरकबान, पोशि आशिष भुरकुंडे, शाम गोरले, राहुल वाघमारे, नसीम, विशाल, हेमचंद, पवन, फोकमारे व डाखोरे यांनी केली.


