नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..
नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी गजाआड…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी तानबा इंदूरकर, रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अप. क्र. १७७/२४ कलम ४२० ,४०६ ,४६५ ,४६७ ,४६८ ,४७१.१२०(ब),३८४, ३८६,५०६,३४ भादंवी अन्वये दाखल करण्यात आला होता. या मध्ये पोलिसांनी चार जणांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, कागदपत्रे, सोन्या-चांदीचे दागिने आदी जप्त केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, यातील आरोपीतांनी प्रॉपर्टी डिलर, लिज, आणि सिटी सर्वेचे काम करण्याचे आमिष दाखवून त्या माध्यमातुन फिर्यादीसोबत ओळख करून आणि फिर्यादीचा वृध्दपणाचा फायदा घेवून तसेच फिर्यादीचा मुलगा प्रकाश, सुन रश्मी, पुतण्या कृपासागर व सुनेचा भाऊ अनुप जनबंधु यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तसे खोटे कागदपत्रे बनवून तसेच इन्वेस्टमेंट प्लान मध्ये इन्वेस्ट करून डबल पैसे करून देतो यासाठी दोन प्लॉट तुमचे आम्ही विकून टाकले त्या बद्दल आंम्ही ४ प्लॉट मिळवुन देवू असे वेगवेगळे आमिष दाखवून फिर्यादीला १) वैशाली विश्वनाथ शेट्टीगार (वैशाली सुदर्शन एनैवार) २) सुदर्शन एनैवार ३) सोनाली संजय एनैवार ४) सुदर्शनचा भाऊ सिध्दु ५) विशाल विश्वनाथ शेट्टीगार ६) अविनाश नंदा, ७) निशा नंदा, ८) कृणालकांत सरवारी, रा. हिंगणा नागपूर. ९) शहानवाझ खान रा. नागपूर १०) सिमा कोथे रा. नागपूर या सर्वांनी संगनमताने २०१८ ते २०२३ च्या दरम्यान वेळोवेळी फिर्यादीला व फिर्यादीच्या परिवाराला ठार मारण्याची भीती दाखवुन आणि धमकावून फिर्यादी कडून रोख व ऑनलाईन स्वरूपात एकुण रू.३ करोड १७ लाख खंडणी घेवून त्या बदल्यात बनावट सही केलेले चेक देऊन फिर्यादी व फिर्यादीच्या परिवाराचा विश्वासघात करून फसवणुक केली आहे. अशा फिर्यादीच्या तकारीवरून पो. ठाणे गणेशपेठ येथे अप अप. क्र. १७७/२४ कलम ४२०,४०६,४६५,४६७,४६८,४७१.१२०(ब),३८४, ३८६,५०६,३४ भादंवी अन्वये दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हयांमधील पाहीजे असलेला आरोपी यांचा शोध घेण्यातरीता पोलिस उप आयुक्त अर्चित चांडक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली तीन पोलिस पथके तयार करून नागपुर शहरामध्ये तीन ठिकाणी रेड कारवाई केली असता वरील आरोपी मिळून आले. नमूद आरोपीतांकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता नमूद अरोपीतांचा गुन्हयात सहभाग असल्याचे प्रथामिक तपासात निष्पन्न झाल्याने तसेच आरोपीतांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्यावरून नमूद आरोपीतास अटक करण्यात आली व त्यांचे घराचे झडती दरम्यान मोबाईल, लॅपटॉप, कागदपत्रे, सोन्या चांदीचे दागीने इत्यादी जप्त करण्यात आले. नमुद आरोपीतांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने (दि.१४मे) पर्यंत पोलिस कोठडी रिमांड (पी.सी. आर.) देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील,पोलिस उपायुक्त(आर्थिक गुन्हे शाखा) अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पथक सपोनि सागर आव्हाड, संतोष मुढे, मसपोनि स्वाती देवधर, पोउपनि सागर ठाकरे, पोहवा रत्नाकर वलके, गजानन गिरी, राजेंद्र नेरकर, उपेंद्र टेंबरे, चंद्रशेखर घागरे, विजय त्रिवेदी, नापोशि विलास इंगळे, पुजा ठाकुर, सिमा नांदूरकर, अविक्षणी भगत, पोशि.रविंद्र जाधव, विजय यादव, मुजाजी हंगे व मंगेश गौरकर यांनी केली आहे. नमूद गुन्हयाचा तपास पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील सहा.पोलीस निरीक्षक सागर आव्हाड हे करीत आहेत.