हुडकेश्वर पोलिसांनी ४ दिवसात घरफोडीचा गुन्हा उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

घरफोडी करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकांसह दोघांना अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त…

नागपूर (शहर प्रतिनिधी) – हुडकेश्वर पोलिसानी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी करणाऱ्या १) आयूश आशिश लखोटे (वय १८ वर्ष), रा.मिलींद बोध्द विहार जवळ रामबाग पो.ठाणे इमामवाडा, नागपूर, २) मोहीत विनोद मेश्राम (वय २० वर्ष) रा.न्यू. कैलास नगर, गल्ली नं. २, नारनवरे च्या घरी किरायाने पो.ठाणे अजनी, नागपूर आणि एक विधीसंघर्ष बालक यांना शिताफीने अटक करून यांच्याकडून ७ लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी – उज्वल नरेंद्र पांडे (वय ३५ वर्ष) रा.प्लॉट नं.१९, महालक्ष्मी नगर, नं.२ मानेवाडा रोड, नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात २६३/२०२४ कलम ४५४,४५७,३७९,३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी उज्वल नरेंद्र पांडे (वय ३५ वर्ष) रा.प्लॉट नं. १९, महालक्ष्मी नगर, नं.२ मानेवाडा रोड, नागपूर. (दि.०४एप्रिल) रोजी ते सायंकाळी ७.३० वा.सू. महालक्ष्मी नगर, नं.२ या घरी आले व रात्री ९.३० वा सासरे यांचेकडे वंजारी नगर येथे गेले  (दि.०५एप्रिल) रोजी सकाळी ०८.४० वा घरी परत आले असता मूख्य दाराला लागलेला कुलूप व कोंडा तूटलेला अवस्थेत खाली पडलेला दिसला घरात जाऊन पाहिले असता सर्व लाईट सूरू दिसले व किचनचे दार तोडलेले दिसले व बेडरूम मधील लोखंडी आलमारी मधील १) सोन्याचे मगंळसूत्र एकूण ८६ ग्रॅम कि.३,४४,०००/रू २) तिन लहान अंगठ्या एकूण वजन ३४ ग्रॅम कि.१,३६,०००/रू ३) चार कानातले रिगं एकूण १५ ग्रॅम कि.६०,०००/रू ४) दोन गोफ व एक चैन एकूण ३७ ग्रॅम कि.१,४८,०००/रू ५) दोन पेंडन ४ ग्रॅम कि.१६,०००/रू ६) दोन मोतीहार, एक लफवा एकूण कि.४०,०००/रू ७) चांदीचे भांडे व दागिणे १ किलो कि.४०,०००/रू ८) नगदी ४०००/रू ९) विदेशी नोट व सिक्के YEN अमेरीकन २ डॉलर १०) १० यूरो यूरोप सिक्के, व नोट ११) FRANC हे फ्रान्सची ३ सिक्के १२) न्यूजीलॅन्डचे २ डॉलर १३) चेक रिबलीकन काउन १५, १४) SYCHELLES येथील १० रूपये १५) श्रीलंकन २० रूपये १६) ४ घडयाळ असा एकूण नगदी, सोने, चांदी व इतर वस्तू असा एकूण ७,८८,०००/रू. चा माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून सदरचा गून्हा दाखल करण्यात आला होता.



सदर गुन्हयाचे तपासादरम्यान विश्वसनीय बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त करून यातील नमूद सराईत आरोपी १) आयूश आशिश लखोटे २)मोहीत विनोद मेश्राम यांना तसेच एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेऊन बारकाईने गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन मा.  न्यायालय नागपूर यांनी न्यायालयातून त्यांना पोलिस कोठडी. प्राप्त करून सदर गुन्हा करताना वापरण्यात आलेले १) अॅक्टीवा गाडी क्र.एम.एच-४९ ऐ.वी-७७५६ कि५०,०००/रू. २) दोन पिवळया धातूची अंगठी वजन अंदाजे १० ग्रॅम कि.६०,०००/रू ३) चार सोन्याचे मर्गळसूत्र एकूण ८६ ग्रॅम कि.३,४४,०००/रु. ४) चार कानातले रिंग एकूण १५ ग्रॅम वजनाचे कि.१,००,०००/रू. ५) तिन अंगठ्या १,००,०००/रू. ६) पांढऱ्या धातूचे एक ताट, एक लहान वाटी, दोन दिवे, समई एक मूकूट, तिन करंडे, चम्मच, एक जोड पायातील पैजन, एक मासा, पायातील जोडवे, कमरेला लावण्यात येणारा आकोडा, एक फूल फूल असणारी साखळी, एक मंगळसूत्र पांढरा धातूचा एक व पिवळया/पांढऱ्या धातूचे दोन सिक्के असे एकूण वजन ७०० ग्रॅम कि.५०,०००/रू असा एकूण ७,०४,०००/रू. चा माल हा मिळून आला. अशा प्रकारे एकूण चोरीस गेलेले सोन्याचे दागीने व चांदीचे दागीने कि.७,०४,००० /रू.चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.



सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त दक्षिण विभाग शिवाजीराव राठोड,पोलिस उपायुक्त परीमंडळ ४ विजयकांत सागर, सहा.पो.आयुक्त विनायक कोते, अजनी विभाग, यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, पोउपनि माघव गूडेकर, स.फौ शैलेश ठवरे, पोहवा. गणेश बोदर,.आशिष तितरमारे,चंद्रशेखर कौरती, नापोशि राजेश मोते, मूकेश कन्नाके, पोहवा मनोज नेवारे  संदिप पाटील, पोशि मंगेश मडावी, सर्व नेमणूक पो.स्टे. हुडकेश्वर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!