अट्टल वाहन चोरट्याला वाहनांसह पाचपावली पोलिसांनी केली अटक…
अट्टल वाहन चोरट्याला वाहनांसह पाचपावली पोलिसांनी केली अटक…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – पाचपावली पोलिसांनी वाहन चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तांत्रिक विश्लेषण अन् कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने ताब्यात घेऊन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्याचे कडून टाटा एस गोल्ड गाडी किं. साडेसात लाख रुपये आणि काळ्या रंगाची फॅशन प्लस गाडी किं.85 हजार रू. असा एकुण 8 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी शेख शोहराब शेख रफीक शेख, (वय 39 वर्षे) रा.पवन नगर प्लॉट नं.651 राजाराम बादुले शाळे जवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचपावली पोलिस ठाण्यात 589/24 कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी नामे – शेख शोहराब शेख रफीक शेख (वय 39 वर्ष) रा.पवन नगर प्लॉट नं.651 राजाराम बादुले शाळे जवळ पो. ठाणे यशोधरा नगर नागपुर याने त्याची गाडी ही (दि.25जून) रोजी रात्री 21.00 वाजता मेंहदीबाग कॉर्नर मामा अगरबत्ती च्या दुकाना समोर फिर्यादीने त्याची टाटा एस गोल्ड गाडी (कि. अं.750,000/- रु.) ची गाडी च्या दाराला कुलूप लावुन घरी गेला आणि 26जूनला येऊन पाहीले असता गाडी ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. ती गाडी कोणीतरी अज्ञात चोराने गाडीचे दाराचे कुलूप तोडून चोरून नेली. अशा फिर्यादीने दिलेल्या रिपोर्ट वरून अप.क्र. 589/24 कलम 379 भादवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी व गाडीचा शोध घेत असतांना तांत्रीक विश्लेषण च्या माध्यमातुन तसेच गुप्तबातमीद्वारे मिळालेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यातील आरोपीचे ताब्यातुन चोरीस गेलेली गाडी मिळुन आली. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली 1) क्रिम रंगाची टाटा एस गोल्ड गाडी क्रमांक MH-36-AA-1014 चेचीस नं. (कि.अं.750,000/- रु.) मेमोरंड पंचनामा प्रमाणे गुलमोहर नगर कळमना येथील बाजारातुन चोरी केलेली 2) काळ्या रंगाची फॅशन प्लस गाडी क्रमांक MH-35-DC-2717 (कि.अं. 85000/- रु.) असा एकुण 835,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुह्यातील आरोपीला अप.क्रमांक 589/24 कलम 379 भादवि. मध्ये अटक करून न्यायालय प्रथम श्रेणी कोर्ट क्रमांक 05 नागपुर शहर येथे एम.सी.आर. वर पाठविण्यात आले.
अशा प्रकारे सदर कार्यवाही हि पोलीस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह.पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग प्रमोद शेवाळे,पोलिस उप आयुक्त परिमंडळ 3, गोरख भामरे, सहा.पोलीस आयुक्त, लकडगंज विभाग श्वेता खाडे, वपोनि. बाबुराव राऊत पोलीस ठाणे पाचपावली नागपुर शहर, यांचे मार्गदर्शनात सपोनि.प्रविण सोमवंशी, पोहवा. पवन भटकर, पोहवा.छगन शिंगणे, नापोशि.नितीन वर्मा, नापोशि.प्रकाश राजपल्लीवार,पोशि शाहनवाज मिर्जा,.ओमप्रकाश बुरडे,पवनसिंग ठाकुर पाचपावली नागपुर यांनी केली आहे.