सराईत वाहनचोरटा ईक्का यास युनीट १ ने ताब्यात घेऊन उघड केले ५ गुन्हे…
सराईत दुचाकी वाहन चोरट्यास नागपुर शहर गुन्हे शाखा युनीट १ ने ताब्यात घेऊन उघड केले ५ वाहन चोरीचे गुन्हे,१,०१,०००/- रू चा मुद्देमाल केला जप्त…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दिनांक १२.०४.२०२४ चे ७..३० वा. ते ९.३० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे प्रतापनगर हद्दीतील, मुस्कान अपार्टमेंट, त्रिमुर्ती नगर चौक, प्रतापनगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी प्रतीक बलराम येरगुडे, वय २३ वर्षे यांनी त्यांची होन्डा अॅक्टीव्हा मोपेड क्र. एम.एच ३४ ए. टी ५६७० किं. २५,००० /- रू ची ही मेट्रो स्टेशन छत्रपती चौक, वर्धा रोड, नागपूर येथे पार्क करून, लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे प्रतापनगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेवुन व नमुद गाडीचे चलान कारवाई बाबत फोटो तथा कागदपत्रे प्राप्त करून तसेच गुप्त बातमीदारा मार्फतीने मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन आरोपी हर्ष उर्फ ईक्का महेन्द्र रामटेके वय २३ वर्ष रा. तिरोडा, खैरलांजी रोड, गोंदीया, ह.मु भांडेप्लॉट, सावरकर हॉस्पीटल मागे, सक्करदरा, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता,
त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.
तसेच आरोपीचा अभिलेख तपासला असता तो वाहन चोरी, घडफोडी, जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलीस ठाणे तिरोडा येथे १ वाहन चोरीचा गुन्हा, पोलिस ठाणे प्रतापनगर येथे २ वाहन चोरीचे गुन्हे, पोलिस ठाणे गणेशपेठ येथे २ वाहन चोरीचे गुन्हे असे एकुण ०५ वाहन
चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन प्रत्येक गुन्हयातील १ वाहन याप्रमाणे एकुण ५ वाहन किंमती अंदाजे १,०१,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी प्रतापनगर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलिस आयुक्त, नागपुर शहर,डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोर्जे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)संजय पाटील,पोलिस उपायुक्त (डिटेक्शन)निमीत गोयल, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा)डॅा अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, सपोनि सचिन भोंडे, पोहवा. रितेश तुमडाम, बबन राऊत, विनोद देशमुख, सुनीत गुजर, हेमंद लोनारे, शरद चांभारे, सोनू
भावरे, नापोशि. सुशांत सोळके, मनोज टेकाम, योगेश सातपूते, पोशि. रविन्द्र राऊत, स्वप्नील खोडके व नितीन बोकुलकर यांनी केली.