
वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना शिकाफिने घेतले ताब्यात….
वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना केली अटक…
नागपूर शहर (प्रतिनिधी) – वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून गुन्ह्यांची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३१०(२), ३५२, ३५१(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा नोंदविला होता.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाठोडा पोलिसांनी (दि.१२ऑक्टोबर) रोजी ०१.३० वा.च्या सुमारास, पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. ४४, अलिशान नगर, जिजामाता नगर, वाठोडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आरीफ ईनायतखान पठाण, (वय २८ वर्षे), हे गुन्ह्यामध्ये मध्यवर्ती कारागृह येथे दाखल असतांना तेथे त्यांची ओळख झालेले आरोपी १) कुणाल सुरेश हेमने, (वय २४ वर्षे), रा.प्लॉट नं. १९४, आझाद नगर, बिडगांव, २) विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता, (वय २२ वर्षे), रा.प्लॉट नं. १४९, श्रावण नगर, वाठोडा ३) सुजीत भाऊराव घरडे, (वय २३ वर्षे), रा. रामनगरी, वाठोडा, ४) कुलदिपसिंग लखनसिंग बावरी, (वय २९ वर्षे), रा.वार्ड नं. २, खैरी पोलीस चौकीमागे, बुट्टीबोरी, नागपूर पाहीजे असलेला आरोपी ५) अफसर उर्फ अंडा, (वय ४५ वर्षे), रा.गिट्टीखदान यांनी फिर्यादीचे घराजवळील जिजामाता नगर, चारडिपी जवळ येवुन फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन “तुला ऋषी खोसला याच्या मर्डरच्या सुपारीचे पैसे भेटले आहे, त्यामधील दहा हजार रूपये आम्हाला दे” असे म्हणुन, १०,०००/- रू. जबरीने हिसकावुन घेतले.

तसेच, फिर्यादीची पत्नी व वडीलांना शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलिस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३१०(२), ३५२, ३५१(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा नोंदविला होता.

त्या नंतर वाठोडा पोलिसांनी गुन्ह्याचे तपासात मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून हिंगणा परीसरात सापळा रचुन ह्युंदाई कंपनीची कार क्र. एम.एच.०२, सि.एल. ९२६७ मधील आरोपीना ताब्यात घेतले. आरोपींचे ताब्यातुन हयुंदाई कंपनीची कार, ०२ पिस्टल, ०१ रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुस व ०२ लोखंडी चाकु असा मुद्देमाल मिळुन आल्याने, एकुण कि. अंदाजे २,५०,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना वर नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे असून पाहिजे आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे.
अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल,सह पोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त (दक्षिण प्रभाग) शिवाजीराव राठोड, पोलिस उपायुक्त(परीमंडळ ४) रश्मीता राव, सहा पोलिस आयुक्त (सक्करदरा विभाग)विनायक कोते यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि.हरीषकुमार बोराडे, पोउपनि माधव गुंडेकर, अमोल पाटील, सचिन ठाकरे, कृष्णा साळोके, स्वप्नील राऊत, सागर गायकवाड, पोहवा.अश्वीन बडगे, नापोशि.सुनिल वानखेडे, कैलाश चकोले, पोशि प्रफुल्ल वाघमारे, जितेंद्र मनगटे, मिलींद ठाकरे, राजेश सरकटे, आशिष बांते, कैलाश श्रावणकर, हिमांशु पाटील व कुणाल उके यांनी केली.


