गुन्हे शाखा युनीट ४ ने. उघड केला ATM फोडीचा गुन्हा…
हुडकेश्वर हद्दीतील कटरच्या साहाय्याने ATM कापुन रक्कम लंपास करणाऱ्या एक आरोपी गुन्हे शाखा युनीट ४ च्या ताब्यात,गुन्ह्यांत वापरलेला ट्रकही केला हस्तगत….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७)रोजी चे रात्री ०३.१८ वा. ते ०४.१५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील इंगोले नगर, येथील एस.बी.आय बॅकेचे एटीएम हे कोणीतरी अज्ञात आरोपीने गॅस कटरचे सहाय्याने एमटीएम मशीन कापुन एकुण १,२६,९००/- रू चोरून नेले. अशा फिर्यादी नरेश श्यामराव नवले वय ३९ वर्ष रा. प्रधानमंत्री आवास
योजना, वाठोडा, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४६१,३८०, ४२७ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचा समांतर तपास हुडकेश्वर पोलिस व गुन्हेशाखा युनिट ४ करीत असतांना युनीट ४ ला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून यातील आरोपी क्र. १) राहील सुबदीन खान वय २४ वर्ष रा. ग्राम तुंडलका ता. पुनहना, जि. नुह हरीयाणा यास राजस्थान येथुन ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने त्याचे साथिदार व पाहिजे असलेले आरोपी क्र. २) जाहुल खान रा. ग्राम तुंडलका ता. पुनहना, जि. नुह हरीयाणा ३) फरीद खान ४) सौकत उर्फ सोंडा खान रा. दोन्ही सालहेडी, ता. जि. नुह, हरियाणा यांचे सोबत मिळुन केल्याचे सांगीतले. तसेच आरोपीची सखोल विचारपूस केली असता आरोपीने पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत दिनांक २६.०४.२०२४ रोजी ६.०० वा. चे सुमारास मारोती
नगर, पिपळा फाटा, हुडकेश्वर येथुन चार चाकी माल वाहन गाडी फोस्ट कार्गो किंग कंपनीची गाडी एम एच ४९ ए.टी ३४२४ चोरी केल्याचे सांगीतले. आरोपी जवळुन एक मोबाईल व कागदपत्रे असा एकुण १०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
आरोपींनी नमुद गुन्हा करतेवेळी गुन्हयात वापरलेला अशोक ले – लॅण्ड कंपनीचा ट्रक क्र.एन.एल ०१ ए.ई ५९८७ किंमती अंदाजे २०,००,०००/- रू चा आज रोजी जप्त केला व पुढील तपासकामी
हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात दिला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त संजय पाटील,पोलिस उपायुक्त डिटेक्शन निमीत गोयल,सहा पोलिस आयुक्त(गुन्हे) डॅा अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ४ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रमेश टाले यांचे सुचनेनुसार पोउपनि अविनाश जायभाये,पोहवा सुनील ठवकर,रोशन तिवारी,पोशि स्वप्निल अम्रुतकर,देवेन्द्र नवघरे,श्रीकांत मारवाडे,अतुल चाटे यांनी सायबर टिमच्या मदतीने केली