
अट्टल सोनसाखळी चोरट्यास युनीट ४ ने ओडीसा येथुन घेतले ताब्यात….
चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनीट ४ ने ओडीसा येथुन घेतले ताब्यात…..
नागपूर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २८/०३/२०२४ चे ११.३० वा. चे सुमारास पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीत प्लॉट नं. ०४, प्रिया हाउसींग सोसायटी साकेत नगरी बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या फिर्यादी श्रीमती आशा रामदास थुल वय ६५ वर्ष, हया त्यांचे डेली निडस् व जनरल स्टोर्स चे दुकानात हजर असतांना त्यांचे दुकानासमोर एका काळया रंगाचे मोटर
सायकलवर दोन अनोळखी इसम वय २० ते २५ वयोगटाचे यांनी येवुन त्यापैकी एकाने फिर्यादीस चिप्स व थम्सअप ची बॉटल मागीतली परंतु त्याने बॉटल थंडी नाही असे म्हणुन फिर्यादीस आवाज दिला. फिर्यादी ह्या कांउंटर टेबल जवळ आल्या असता, आरोपीने फिर्यादीचे गळयातील १५ ग्रॅम सोन्याची साखळी किमती ६०,००० /- रू ची जबरीने हिसकावुन पळुन गेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे बेलतरोडी येथे कलम ३९२, ३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलिस आयुक्तांच्या आदेशाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हेशाखा युनिट ४ चे अधिकारी व अंमलदार करीत असतांना, दि. २८ ०३.२०२४ रोजी नागपूर शहरामध्ये एका मोटारसायकलवरील २ अनोळखी आरोपीतांनी पोठाणे बेलतरोडी, सक्करदरा, हुडकेश्वर, तहसील, सोनेगाव हददीअंतर्गत एकूण ०६ चैनस्नेचींग केल्याचे निदर्शनास आले. चैनस्नेचींगचे घडलेले गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस ठाणे ०१) बेलतरोडी येथे अप क्र २३२ / २४ कलम ३९२, ३४ भादवि ०२) सक्करदरा येथे अप क्र १२४/२४ कलम ३९२, ३४ भादवि ०३) हुडकेश्वर येथे अप क्र २३८ / २४ कलम ३९२,३४
भादवि ०४) हुडकेश्वर येथे अप क्र २३९ / २४ कलम ३९२, ३४ भादवि ०५) तहसील येथे अप क्र २०४/२४ कलम ३९२, ३४ भादवि ०६) सोनेगाव अप क्र ५८ / २४ कलम ३९२, ३४ भादवि अन्वये गुन्हे दाखल आहेत. गुन्हेशाखा, युनिट ०४, पथकाने सदर गुन्हयाचे संबंधाने त्वरीत गुन्हयाचे घटनास्थळी भेटी दिल्या.गुन्हयातील फिर्यादी यांचेकडून अनोळखी दोन्हीही आरोपीविषयी परीपुर्ण माहीती एकत्रीत केली. आरोपीची गुन्हे करण्याच्या पध्दतीचे अवलोकन करून आरोपीतांचा शोध घेण्यासाठी गुप्त बातमीदार नेमले.त्यानुसार नमूद पथकात कार्यरत पोहवा नाजीर शेख यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, नमूद गुन्हे हे जाफर अली भोलू अली तसेच जहीर हुसैन वल्द मोहम्मद बिहारी रा. दोघेही खरीया रोड, नुराणी चौक, जिल्हा न्युआपाडा, राज्य ओडीसा यांनी केलेले आहेत. ही माहीती वरिष्ठ अधिकारी यांना देवुन त्यांचे परवानगीने नमुद गुन्हयाचे तपास कामी पथकास ओडीसा येथे रवाना करण्यात आले.
गुन्हे शाखेचे पथक ओडीसा राज्य येथे जावून त्यांनी स्थानीक पोलिसांचे मदतीने नमूद गुन्हयाचा तपास करून बुध्दीकौशल्याचा वापर करून गुन्हयातील नमूद आरोपींची अचूक माहीती काढून सापळा रचुन अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी १) जाफर अली घोलु अली वय १९ वर्ष रा. वार्ड नं. १४ खरीया रोड,धोबी पारा, जि. न्यु आपाडा राज्य ओडीसा पोठाणे जोंकथाना २) जहीर हुसेन वल्द मोहम्मद बिहारी रा. वार्ड नं. १३ खरीया रोड, नुरानी चौक, जि. न्युआपाडा, राज्य ओडीसा, पोठाणे जोंकथाना, यांनी नागपूर शहरात दि. २८.०३.२०२४ रोजी दाखल चैनस्नेचींगचे गुन्हयाची कबूली दिली. आरोपींकडून नमूद ६ गुन्हयातील जबरीने हिसकावून नेलेला
पिवळे धातुचे मंगळसुत्र, चेन, गोफ तुटलेले अवस्थेत असा एकूण ६८ ग्रॅम वजनाचा व किमती ४,०८,०००/–रू,चा मुददेमाल व गुन्हा करणेकरीता वापरलेले वाहन बजाज कंपनीची लाल काळया रंगाची एन. एस. २०० पल्सर गाडी नंबर प्लेट नसलेली किं. १,००,००० /- रू, तसेच गुन्हा करते वेळी वापरलेले हेल्मेट किमती ३००० /- रू व दोन मोबाईल फोन किमती २१,००० /- रू असा एकूण ५,३२,००० /- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
आरोपींची सखोल विचारपुस केली असता नमूद गुन्हे करणेकामी त्यांचा साथीदार व फरार आरोपी हैदर अली अकरम अली वय अंदाजे २२ वर्षे रा. वार्ड क्रमांक १४, धोबीपारा, जिल्हा न्युआपाडा, हा देखील नागपूर येथे त्यांचेसह आला होता. त्याने देखील गुन्हे करते वेळी ओडीसा येथून नागपूर येथे येण्याकरीता व गुन्हे केल्यानंतर नागपूर येथून ओडीसा येथे जाणेकरीता त्यांचे वाहन चालवून आरोपींना मदत केली आहे. आरोपी क्र.२ जहीर हुसेन वल्द मोहम्मद बिहारी हा चैन स्नेचींगचा अट्टल गुन्हेगार असून त्याचेविरूध्द ओडीसा राज्यात विविध पोलिस ठाणे अंतर्गत एकूण २१ चैनस्नेचींगचे गुन्हे दाखल आहेत.गुन्हेशाखा युनिट ४ यांनी नागपुर शहरात धुमाकुळ घालणारे परराज्यीय चैनस्नेचर यांची अचूक माहीती करुन त्यांना परराज्यातून अतिशय बुध्दीकौशल्याने व शिताफीने ताब्यात घेवून, त्यांचेकडून चैन स्नेचींगचे ०६ गुन्हे
उघडकीस आणले. गुन्हयातील मुददेमाल जप्त करून मोलाची व प्रशंसनीय कामगीरी केली आहे.
सदरची कारवाई डॉ. रविंद्र कुमार सिंगल,सह पोलिस आयुक्त अश्वती दोर्जे , अपर पोलिस आयुक्त(गुन्हे). संजय पाटील,पोलिस उपायुक्त (डिटेक्शन),निमीत गोयल साहेब, सहा पोलिस आयुक्त,(डीटेक्शन) डॉ. अभिजीत पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रमेश ताले, पोउपनि वैभव बारंगे, पोहवा नाजीर शेख, निलेश ढोणे, सतीष ठाकरे, युवानंद कडु, आशिष क्षिरसागर, पुरूषोत्तम जगनाडे, नापोशि चेतन गेडाम, अजय पौनिकर, अनंता क्षिरसागर, पोशि महेश सत्येंद्र यादव, लिलाधर भेंडारकर, यांनी केली.



