अवैध शस्त्र बाळगणारा व सराईत वाहन चोरट्यास कपीलनगर पोलिसांनी घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

घातक शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन कपीलनगर पोलिसांनी उघड केले,०४ वाहनचोरीचे गुन्हे व वाहने केली हस्तगत….

नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०५.०४.२०२४ चे ११.१० वा. चे सुमारास पोलिस ठाणे कपिलनगर येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गुप्त बातमीदारा तर्फे माहिती मिळाली की पोलिस ठाणे हद्दीत म्हाडा चौक ते टायर चौक कडे जाणाऱ्या रोडवर मरक्यूरी विलाचे गेट समोर काळया रंगाचे शर्ट घातलेला ईसम बिना नंबरचे अॅक्टीव्हा गाडीसह तसेच हिरव्या रंगाचे शर्ट घातलेला ईसम पल्सर
२२० गाडीवर असुन घातक शस्त्रासह आहे.
अशा मिळालेल्या माहिती वरून पोलिसांचे पथक नमुद ठिकाणी गेले असता, तेथे वरील वर्णनाचे दोन इसम गाडीवर बसलेले होते. ते पोलिसांना पाहुन पळण्याचे प्रयत्नात असतांना त्यांना घेराव टाकुन  तेथेच पकडले. अॅक्टीव्हा गाडी चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव मंथन राजेन्द्र ठाकरे वय २३ वर्ष रा. रंगुबाजीराव नगर, नाका नं. २, पाण्याचे टाकी जवळ असे सांगीतले. त्याचे अॅक्टीव्हाची झडती घेतली असता पायदानावर दुपट्टयामध्ये एक लोखंडी सत्तूर गुंडाळलेला किंमती २००/- रू चा मिळुन आला. त्याचे ताब्यातुन अॅक्टीव्हा गाडी व सत्तूर किंमती अंदाजे २५,२०० /- रू चा मुद्देमाल जप्त केला.तसेच पल्सर गाडी चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अचल संतकुमार सराठे वय २० वर्ष रा. सदवा माता मंदीर मागे, वार्ड क्र. ६, सावनेर, जि. नागपूर असे सांगीतले. त्याचे ताब्यातुन बिना नंबरप्लेट असलेली





पल्सर २२० गाडी किंमती अंदाजे ५०,००० /- रू ची जप्त करण्यात आली.
दोन्ही आरोपींना वाहनाचे कागदपत्रे व विनानंबर प्लेट बाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तरे दिले नाही.आरोपी हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने संशयीत वाहने व शस्त्रासह समक्ष मिळुन आल्याने तसेच, त्यांनी  सह पोलिस आयुक्त , नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलिस ठाणे कपिलनगर येथे दोन्ही आरोपींविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली, आरोपींना सखोल विचारपूस केली असता आरोपी क्र. २) अचल संतकुमार सराठे याने नागपूर ग्रामीण हद्दीतुन वरील वाहना व्यतीरिक्त एक काळया रंगाची रॉयल एनफील्ड कंपनीची क्रमांक नसलेली बुलेट गाडी व एक काळया रंगाची बजाज कंपनीची क्रमांक नसलेली पल्सर गाडी चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन चोरी केलेले वरील दोन्ही वाहने किंमती १,५०,०००/- रू ची जप्त करण्यात आली. आरोपींचे ताब्यातुन एकुण चार वाहने व लोखंडी सत्तूर असा एकुण २,२५,२०० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (उत्तर विभाग)पोलिस उपायुक्त परीमंडळ ५ निकेतन कदम,सहा.पोलिस आयुक्त (जरीपटका विभाग) संतोष खांडेकर,यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजय आकरे, पोहवा गणेश बरडे, आसीफ शेख,पोशि संजु भुषनम, प्रविण ईनवाते यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!