
१ कोटीची फसवणुक करणाऱ्या आरोपीस मुंबई येथुन केली अटक,नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कार्यवाही…
१ करोड रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
नागपूर (प्रतिनिधी) – खोट्या ट्रेड प्रॉफिट फंड बाबत सांगून भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची रोख १ करोडची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींना अटक करून ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेले अनेक दिवस पोलिस सापळा रचून यांच्या मागावर होते. पण आरोपी हाताला लागत नव्हते पण शेवटी पोलिसांनी शिताफीने त्यांना अटक केली आहे.


या बाबत थोडक्यात हकिकत अशी की, यातील नमुद आरोपी नामे १) दिपानकर सरकार २) अमजद खान ३) मंदार कोलते ४) चंद्रशेखर रामटेके ५) पांडुरंग इसारकर ६) प्रमोद कुडे ७) प्रदिप ८) सुरज डे ९) मंगेश पाटेकर १०) भरत सुलेमान ११) अमन पांडे १२) राजु मंडल यांनी संगनमत करून यातील फिर्यादीस खोटया ट्रेड प्रॉफीट फंड स्किम बाबत सांगुन ५० टक्के प्रॉफीट होईल असे सांगुन फिर्यादी स्वाती, रा.नागपूर यांच्या कडुन १ करोड रूपये रोख रक्कम घेवुन परत न करता जिवे मारण्याची धमकी दिली वरून फिर्यादीचे रिपोर्ट वरून धंतोली पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत नमुद आरोपीतांविरूध्द सदर गुन्हा दाखल आहे.

नमूद गुन्हयातील संशयीत महीला आरोपी नामे विद्या नागपूरे हिच्याकडुन एक अंदाजे रू. १,६०,०००/- ची टि.व्ही.एस. इलेक्ट्रीक मोपेड जप्त करण्यात आली आहे. आरोपी नामे सुरज डे याला अटक करून त्याचे कडुन एक फॉरच्युनर कार अंदाजे रू.२५,००,०००/- ची जप्त केली. नमूद गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे मोहम्मद जवाद फारूख बोरा, वय ३४ वर्षे. रा. रूम नं. २ कासा मॅक्सीमा बायलोचा हटकेश्वर मिरा रोड, पोलिस ठाणे काशीमीरा, ठाणे याचा काईम ब्राच युनिट क.०१, काशीमिरा मि.भा.व. वि. ठाणे यांचे मदतीने शोध घेतला असता तो जि.सी.सी. हॉटेल हार्टकेश येथे मिळून आला. त्याला पथकाकडून ताब्यात घेवून त्यांचेकडे नमूद गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता. त्याचा नमूद गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने तसेच त्याने नमूद गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आलेली आहे. नमूद गुन्हयातील अटक आरोपी नामे मोहम्मद जवाद फारुख बोरा उर्फ सुलेमान उर्फ भरत याचे राहते घरातून काही महत्वाचे १) कागदपत्रे २) नोटा मोजण्याची मशिन, ३) सॅमसंग कंपनीचा मोबाईल, ४) विवो कंपनीचा मोबाईल, ५) मारूती कंपनीची बलेनो कार किमंत अंदाजे रू.८,००,०००/- असे एकुण रू. ८६३,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपीस न्यायालयासमक्ष हजर करून त्याचा दिनांक १३/०१/२०२४ पावेतो पीसीआर घेण्यात आला आहे. पीसीआर दरम्यान आरोपीकडुन अद्यापावेतो एकुण १६,६३०००/- रू.चा. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नमूद गुन्हयाचा तपास पोलिस आयुक्त अमितेश कुमार,सह.पोलिस आयुक्त, अश्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलिस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे व सायबर गुन्हे अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील सहा. पोलिस निरीक्षक सागर आव्हाड हे करीत आहेत.
कारवाई पथक सपोनि सागर आव्हाड, सफौ संजय सोनोने, पोहवा भगवान बुधवंत, पोशि.राहुल ठाकुर, पोशि.रविंद्र जाधव, मपोशि. अविक्षणी भगत आदींनी कारवाई केली आहे.


