
धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिस कोठडी…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुरात काही जणांनी मिळून वर्धा येथील एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्याचे मित्र देखील आहेत. दोन कोटी रोख दिल्यावर एक कंपनी ३.२० कोटी रुपये ऑनलाईन जमा करेल, अशी बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या मध्ये मुख्य आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी जयेश चंदराणा हे अनाज खरेदी विक्री व्यापारी असुन यांनी ट्रेड प्रॉफिट फंड (टीपीएफ) नावाचा फंड चालवणा-या कंपनीमध्ये जर नगदी २ करोड रूपये दिले तर कंपनी ३.२० करोड रूपये ते बँक खातेमध्ये आर.टी.जी.एस. द्वारे टाकतात असे खोटे आश्वासन आसिफ रंगुनवाला तसेच सत्येद्र शुक्ला, मेहुल मार्डीया उर्फ गणपत, व त्यांचे मुंबईतील सहकारी कैलास नरवाडे, अजय अग्रवाल उर्फ सुलतान तहेखान, विवेक अग्रवाल यांच्या मदतीने देऊन फिर्यादी व पिडीत यांना नगदी २ करोड रुपये नमूद पी.भगत अँड कंपनी, रंगुनवाला चौक, नागपूर येथे जमा करायला लाऊन ते ठरलेप्रमाणे आरटीजीएस द्वारे फिर्यादी यांचे खातेवर परत जमा न करता तेथील कार्यालयातील लोकांनी व मुंबई स्थित इसमांनी सदरचा व्यवहार जणुकाही बनावट नसुन खराच आहे असे दर्शवुन सर्वांनी एक परीपुर्ण योजना आखुन, फौजदारीपात्र कट रचुन संगणमताने फसवणुक केली म्हणुन फिर्यादी नामे जयेश यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गणेशपेठ पोलिस ठाणे येथे गुरनं.८७/२०२३ भादवि कलम ४२०,४०६,१२०ब,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नमुद गुन्हयात यापुर्वी ३ आरोपीतांना अटक करण्यात आली असुन एकुण रू. ८०,००,०००/- लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

नमुद गुन्हयात मुख्य आरोपी मो.ताहा खान वल्द जलील अहमद खान उर्फ सुलतान क्रॉफर्ड मार्केट, मुंबई हा गुन्हा दाखल झाले पासून फरार होता. त्याने अटकपूर्व जामिनाकरीता उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तपासा दरम्यान तपासी अधिकारी यांनी अत्यंत कार्यकुशलतेने आरोपीच्या सहभागा बाबत पुरावे गोळा केले व न्यायालयाच्या निदर्शनास आणुन आरोपीचा अटकपूर्व जामिन अर्ज रद्द केला. त्यानंतर आरोपीताने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली परंतु न्यायालयाने जामिन नामंजूर केल्याने मा. न्यायालयाचे आदेशाने आरोपी हा न्यायालयाचे स्वाधीन झाल्याने आरोपीतांस न्यायालयाचे आदेशानुसार प्रॉडक्शन वारंट वर ताब्यात घेवून अटक करण्यात आली व पोलिस कोठडीकरीता न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने ७ दिवस पोलिस कोठडी दिली.

सदरची कार्यवाही पुढील तपास पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल, सह.पोलिस आयुक्त अश्वती दोर्जे, पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील तपास अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक सागर आव्हाड हे करीत आहेत.


