नियोजन भवनातील वातानुकुलीत यंत्राचे कॅाम्प्रेसर चोरणारा सदर पोलिसांचे ताब्यात…
नियोजन भवनात चोरी करणाऱ्या आरोपीस सदर पोलिसांनी घेतले ताब्यात….
नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १५/०९/२०२१ चे ०६.०० वा. ते दि. १२/०९/२०२२ चे दरम्यान, पोलिस ठाणे सदर हद्दीत ग्रामीण रजिस्टार ऑफीस जवळील नियोजन भवन, येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने ए.सी, कॉम्प्रेसर व ए.सी. चे ईतर साहित्य असा एकुण अंदाजे किमत३,६३,५०० /- रू चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी सौदागर विश्वनाथ बागडे, वय ४७ वर्ष, रा. प्लॉट नं. ३७, सुरक्षा नगर, दत्तवाडी, नागपूर यांनी दिनांक १६/९/२२ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे सदर येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान सदर पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून, मिळालेल्या माहितीवरून, सापळा रचुन आरोपी
राजराखन उर्फ पटवारी छोटेलाल पटेल, वय ३८ वर्ष, रा. आबी, ता.
मनगवा मेथोरी जि. रिवा मध्य प्रदेश, ह.मु प्लॉट नं. २३, माता नगर, झिंगाबाई टाकळी, नागपूर
यास ताब्यातुन घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीस सदर गुन्हयात अटक करून आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेले ए.सी, कॉम्प्रेसर असा एकुण १,२०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करून पुढील तपास सदर पोलिस करीत आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार,पोलिस उपायुक्त (परि क्र. २) राहुल मदने, सहा. पोलिस आयुक्त सदर विभाग अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विनोद राहंगडाले, पोउपनि कुणाल धुरट, पोहवा मिलींद भगत, सतिश गोहत्रे, नापोशि आशिष वहाळ, पोशि. सचिन कावळे, बालाजी गुट्टे, मोनू सैय्यद, पंकज तिवारी यांनी केली.