सदर नागपुर पोलिसांनी अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले अनेक गुन्हे….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सराईत मोबाईल चोरट्यास सदर  पोलिसांनी केली अटक,अनेक गुन्हे केले उघड….

नागपूर शहर (प्रतिनिधी) – नागपूर शहर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या एका अट्टल मोबाईल चोरट्यास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून एक हिरो होन्डा पॅशन काळ्या रंगाची क्र.MH 31 CD 6295 कि.अं. १५,०००/- रु. आणि वेगवेगळ्या कपंनीचे एकुण ३३ अँड्रॉईड मोबाईल प्रत्येकी कि. अं.२०,०००/- रू. प्रमाणे ६,६०,०००/- रू असा एकुण ६,७५,०००/- रू. मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी निरज माखनलाल यादव, (वय २४ वर्षे), रा. प्लॉट नं.९७, मानव नगर, बुध्द विहार जवळ, टेका नाका नारी रोड, पो. ठाणे कपील नगर, नागपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत थोडक्यात माहिती अशी की, यातील नमुद घटना ता. वेळी वरील पोलिस स्टाफ हे वांरवार होणारे चोरीचे घटना प्रतिबंध करण्यासाठी साध्यावेशात सापळा रचुन सतर्कतेने मंगळवारी बाजार येथे पेट्रोलिंग करीत असतांना यातील अटक आरोपी याच्या वर लक्ष केंद्रीत केले असता नमुद अटक आरोपी हा त्याचे ताब्यातील दुचाकी गाडी चालु करून त्याचेकडील लाल रंगाचे बॅग सह वेगाने पळु लागला करीता त्याचे वर संशय आल्याने त्याचा पाठलाग केला असता तो इसम भरपुर वेगाने पळु लागला त्यास मंगळवारी पुलाच्या खाली, गोवा कॉलनी रेल्वे पटरी येथे सोबत स्टाफच्या मदतीने घेराव करून त्यास ताब्यात घेतले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्याच्या ताब्यातील एक हिरो होन्डा पॅशन काळया रंगाची क्र. MH 31 CD 6295 कि. अं. १५,०००/- रू. ही गाडी पो. ठाणे सदर अप. क्र. ७२/२०२४ कलम ३७९ भादवि मधील असल्याचे निश्पन्न झाली, त्यावरून त्याचे नाव-पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शेख रियाज शेख मुजाहिद (वय २३ वर्षे), रा- गाव डाक बंगला मोती झरना, साहीबगंज, पो. तालुका तालझाडी (झारखंड) हल्ली मु.- गुलशन नगर, राकेश गजभिये, याच्या घरी किरायाने यशोधरानगर, नागपुर शहर असे सांगितले.



त्या वरून त्याचेकडील लाल रंगाची बॅग ची पाहणी केली असता न्युज पेपर मध्ये वेगवेगळ्या कपंनीचे एकुण ३३ अँड्रॉईड मोबाईल दिसुन आले. त्यावरून त्याचेकडे मोबाईल बाबत विचारपुस केली असता त्यांने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावरून त्याला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सागितले.की नागपुर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणाहुन लोकांचे लक्ष विचीलीत करून चोरी केलेले मोबाईल असल्याचे सागितल्याने पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांना माहीती दिली असता त्यांच्या आदेशाने नमुद इसमाची दोन प्रतिष्ठीत पंचासमोर अंगझडती घेऊन पंचनामा तयार करून अटक करण्यात आली.



सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रविन्द्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,पोलिस उपायुक्त परी.२ राहुल मदने, सहा पोलिस आयुक्त,सदर विभाग माधुरी बावीस्कर, नागपुर शहर,वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे,पोलिस ठाणे सदर, नागपुर शहर, यांच्या आदेशाने पोलिस उपनि कुणाल धुरट, पो.हवा. सतिश गोहत्रे, मिलीद भगत, नापोशि अशिष बहाळ,पोशि सय्यद हबीब,सचिन कावळे,पंकज तिवारी,बालाजी गुट्टे, सर्व नेमणुक, गुन्हे प्रकटीकरण पथक, पोलिस ठाणे सदर, नागपुर शहर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!