OLX वर जाहिरात देऊन दुचाकी विकणे तरुनीला पडले चांगलेच महागात,नंदनवन येथे गुन्हा दाखल….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नंदनवन(नागपुर शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की ओएलएक्सवर बाइक विक्रीची जाहिरात पोस्ट करणे एका मुलीला चांगलेच महागात पडले. ऑनलाइन जाहिरात पाहून बाईक खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने ट्रायलसाठी बाइक घेतली आणि परत आलाच नाही. अनेक प्रयत्न करूनही तो तरुण परत न आल्याने तरुणीने त्याला बोलवायला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने त्या व्यक्तीविरोधात नंदनवन पोलिसात तक्रार नोंदवली.

तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. पारुल सोनी असे या तरुणीचे नाव असुन





मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही चोरीची घटना घडली आहे. पारुल सोनी या तरुणीने ओएलएक्स वेबसाइटवर दुचाकी विक्रीची जाहिरात अपलोड केली होती. ती जाहिरात पाहून सचिन नावाच्या इसमाने तिला फोन करून बाइक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ती गाडी
पाहण्यासाठी आरोपीने पारुलला केडीके कॉलेज रोडवर बोलावून ट्रायल देण्यास सांगितले. दोघेही तेथे पोहोचल्यानंतर सचिनने पारुलला दुचाकी ट्रायलसाठी नेण्याबाबत विचारणा केली. तिने होकार दिल्यानंतर तो बाईकवर बसला आणि पुढे निघून गेला.



मात्र बराच वेळ होऊनही तो परतला नाही. तरुणीने त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता. सचिन दुचाकीसह फरार झाला असून आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात आल्यानंतर तरुणीने तात्काळ नंदनवन पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला असून
आरोपीचा कसून शोध सुरू आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असून, सर्वांनी सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!