
उमरेड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,८ आरोपीं अटकेत…
उमरेड पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयावर उमरेड पोलिसांचा छापा,८ आरोपींसह २,६५,५८०/-₹ चा मुद्देमाल केला जप्त…,
उमरेड (नागपुर )प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी अवैध धंदे बाबत कडक मोहीम राबविण्याबाबत सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्यानुसार दि.२८ रोजी संध्या ०५/०० वा. ते ०६/०० वा. चे दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली की काही ईसम शेव सिल्व्हर शाळेच्या मागे असलेल्या शेतात जुगार खेळताय अशा माहीतीनुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी आरोपी नामे (


१) प्रशांत भागवत नेहते,वय ४९ वर्ष,

(२) प्रफुल अशोकराव जांभुळे, वय ३४ वर्ष

(३) संदिप मारोती मौदेकर वय ३२ वर्ष, तिन्ही रा. मंगळवारीपेठ उमरेड
(४) विश्वनाथ चंद्रभान सदावर्ते वय ४८ वर्ष,
(५) प्रशांत वामदेवराव कारगावकर वय ४० वर्ष, दोन्ही रा. जोगीठाणापेठ उमरेड
(६) महेश जनार्धन निखार वय ३८ वर्ष, रा. बुधवारीपेठ उमरेड,
(७) गजानन गुनवंत हंगे वय ४० वर्ष, रा. घाटाळी रोड उमरेड
(८) उत्तम रामकृष्णाजी सातव वय ४७ वर्ष रा. डहाके ले आऊट उमरेड जि. नागपुर
हे मौजा शेव सिल्वर ओक शाळेच्या मागे शेत शिवारात सार्वजनीक ठीकाणी बावन्न ताश पत्त्यावर पैश्याची बाजी लावुन जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्यांच्या कडुन एकुण नगदी ४०५८०/-रू. तसेच घटनास्थळी मिळुन आलेल्या ०६ मोटार सायकली एकुण किंमती २,२५,००० /- रु. असा एकुण २,६५,५८० /- रू. चा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण . हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक डॅा संदिप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांच्या मार्दगर्शानाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, पो.उप.नि. वाघ, पो.हवा. प्रदिप चवरे, राधेश्याम कांबळे, रमेश खरकाटे, पोना पंकज बट्टे, पो. शि. गोवर्धन शहारे, नंदकिशोर शेन्डे, राजन भोयर यांनी पार पाडली.


