
कौटुंबिक कलहातुन सुनेने सासूला संपविले
कौंटुबिक वादातून सुनेने चाकूने वार करत सासूला संपवलं; नागपुरातील घटनेने खळबळ
प्नतापनगर(नागपुर शहर)– सवीस्तर व्रुत्त असे की शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली
आहे. सासू-सुनेचे वाद हे अनेक घरांमध्ये दिसणारी सामान्य गोष्ट
आहे. मात्र नागपूरमध्ये सुनेने सासूची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.नागपूर शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. सुनेने ८० वर्षीय सासूची चाकूने भोसकून हत्या केली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताना प्रतापनगर पोलिसांनी
घटनास्थळी दाखल होत आरोपी सुनेला अटक केली असुन सासू
ताराबाई आणि सून पूनम यांच्यात कौटुंबिक कारणाने नेहमी
वाद व्हायचे. यातूनच संतापलेल्या सुनेने ताराबाई यांच्यावर
चाकूने हल्ला केला. यात ताराबाई यांचा मृत्यू झाला. पोलिस
अधिक तपास करत आहेत.


