नागपुर लोहमार्ग पोलिसांची कुख्यात गुंड मुक्का यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
नागपुर येथील कुख्यात गुंडाविरुध्द नागपुर रेल्वे पोलिसांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर येथील कुख्यात गुंड मुक्का उर्फ शेख शाहरुख शेख रियाज, वय अंदाजे 26 वर्षे, राहणार डोबी नगर, मुर्तुजा गॅरेजजवळ, महम्मदीया मदरसा जवळ, मोमीनपुरा नागपुर याचेवर यापुर्वी गंभीर दुखापत, चोरी, अंमली पदार्थ, हत्त्यार बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे, जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करुन जबरी चोरी करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापुर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु तो प्रतिबंधक कारवाई ला सुध्दा जुमानत नसल्याने त्याचेविरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन
कुख्यात गुंड मुक्का उर्फ शेख शाहरुख शेख रियाज, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधिक्षक, लोहमार्ग नागपुर डॅा अक्षय शिंदे यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव
पोलिस आयुक्त, नागपुर शहर यांना सादर केला होता. पोलिस आयुक्त, नागपुर शहर अमितेश कुमार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करुन तसेच स्वतःचे स्त्रोताद्वारे माहिती मिळवुन सदर
कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षाकरीता छत्रपती संभाजीनगर जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दिनांक १७.१२.२३ रोजी पारीत केला आहे.पोलिस आयुक्त, नागपुर शहर यांचे आदेशावरुन मुक्का उर्फ शेख शाहरुख शेख रियाज याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करुन त्यास दिनांक १७.१२.२३ रोजी
नागपुर जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक, वैशाली शिंदे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, लोहमार्ग नागपुर पांडुरंग सोनवणे तसेच रेल्वे पोलिस स्टेशन नागपुर येथील पोलिस निरीक्षक, मनिषा काशीद, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कविकांत चौधरी, तसेच पोलिस स्टेशन नागपुर लोहमार्ग येथील पोहवा पुष्पराज मिश्रा,
पोहवा परमानंद वासनिक, पोशि प्रविण खवसे, विशाल मिश्रा,
तेजसिंग राजपांडे, मजहर अली तसेच नागपुर शहर आयुक्तालयातील राजेश पैदलवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
रेल्वे स्टेशन नागपुर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता रहावी याकरीता अशाप्रकारे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात
आली असुन त्यांचेविरुध्द एम.पी.डी.ए. अॅक्ट अंतर्गत कार्यवाही प्रस्तावित आहे.