
पोलिसांच्या नागपुर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत वर्धा पोलिसांचा डंका….
वर्धा – नुकत्याच नागपुर येथील पोलिस मुख्यालयातील मैदानावर नागपुर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा – २०२३ ह्या दिनांक ०४/१०/२०२३ ते ०८/१०/२०२३ दरम्यान नागपुर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत वर्धा जिल्हा पोलिस संघाचे महिला व पुरूष खेळाडु.पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे मार्गदर्शनात विविध वैयक्तीक व सांघीक क्रीडा प्रकारात सहभागी झाले.
या स्पर्धेत पुरूष सांघीक स्पर्धेत हॉकी संघाने अंतिम सामन्यात चंद्रपुर संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच


खो-खो संघाने अंतिम सामन्यात गडचिरोली संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच

व्हॉलीबॉल संघाने अंतिम सामन्यात गोंदीया संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याचप्रमाणे

हॅन्डबॅाल व बास्केटबॉल संघाने व्दितीय क्रमांक प्राप्त केला.
कब्बडी व फुटबॉल संघाने तृतिय क्रमांक पटकावला. तसेच
महिला सांघीक स्पर्धेत कब्बडी संघाने नागपुर ग्रामिण संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला.
व्हॉलीबॉल व बास्केटबॉल संघाने तृतिय क्रमांक प्राप्त केला.
वैयक्तीक किडा प्रकारात सुध्दा
पुरूष ज्युडो प्रकारात ४ गोल्ड, १ सिल्वर व १ ब्रॉझ तसेच तायक्वॉडो मध्ये १ गोल्ड २ सिल्वर,
कुस्ती १ सिल्वर, भालाफेक १ ब्रॉझ असे पदक प्राप्त केले. तसेच महिला वैयक्तीक क्रिडा प्रकारात
१०० मिटर व २०० मिटर धावणे स्पर्धेत गोल्ड,
ज्युडो प्रकारात ३ गोल्ड १ सिल्वर २ ब्रॉझ, कुस्ती ५ गोल्ड २ सिल्वर,
वेटलिफ्टींग २ गोल्ड १ ब्रॉझ, पावरलिफ्टींग १ गोल्ड २ सिल्वर २ ब्रॉझ,
बॉक्सींग १ गोल्ड, वु- शू ३ सिल्वर १ ब्रॉझ, तायक्वॉडो १ ब्रॉझ असे पदक प्राप्त केले आहे.
त्याचप्रमाणे मपोशि सुनैना डोंगरे हिने विवीध क्रीडा प्रकारात उत्कृष्ठ कामगीरी केल्याने तिला स्पर्धेतिल उत्कृष्ठ महिला अॅथलिट म्हणुन गौरविण्यात आले आहे. सदर महिला पोलिस शिपाई हि
मागील ३ स्पर्धेत सुध्दा उत्कृष्ठ महिला अॅथलिट ठरलेली आहे. एकुण स्पर्धेत वर्धा जिल्हा पोलिस संघाने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
नागपुर परीक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेत चांगली कामगीरी करणारे खेळाडु पोलिस अधिकारी / अंमलदार यांचे श्री नूरूल हसन, पोलिस अधिक्षक वर्धा यांनी कौतुक केले असुन आगामी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रिडा स्पर्धेत सुध्दा भरीव कामगीरी करण्याचे आवाहन केले आहे.
सदर स्पर्धेत नूरुल हसन, पोलिस अधिक्षक. सागर कवडे, अपर पोलिस अधिक्षक, मनोज वाडीवे, पोलिस उप अधिक्षक (गृह) यांचे मार्गदर्शनात कमलाकर घोटेकर, राखीव पोलीस निरीक्षक, पो. मु. वर्धा यांचे निर्देशानुसार टिम मॅनेजर राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप बानमारे टिम कॅप्टन सफौ राजेश उमरे, पोउपनि गोमेध पाटील यांनी तसेच सर्व वर्धा जिल्हा पोलिस संघातील सर्व महिला व पुरुष खेळाडु यांनी उल्लेखनिय कामगीरी केलेली आहे.
महत्वाचे म्हणजे पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन हे सुध्दा उत्क्रुष्ट क्रिकेटपटु असुन खेळ आणि खेळाडुंच्या भावना त्यामागची मेहनत आणि करावे लागणारे कष्ट याबळावर वर्धा पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हेच खेळाडु राज्य पोलिस स्पर्धेत सुध्दा यापेक्षाही भरीव कामगिरी करतील यात दुमत नाहीच असा विश्वास श्री नूरुल हसन यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीकरीता सर्व खेळाडुना शुभेच्छा दिल्यात


