
अवैधरित्या रेतीची(वाळु) वाहतुक करणारा अरोली पोलिसांचे ताब्यात….
विनापरवाना अवैध्यरीत्या रेतीची(वाळुची)चोरटी वाहतुक करणाऱ्याच्या अरोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या.,…
अरेली(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि )२७) रोजी पहाटे ०३.३० वा. ते ०४.०० वा. दरम्यान पो. स्टे. अरोली येथील पथक पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडुन खबर मिळाली कि, ट्रॅक्टर (मुंडा ) क्र. एम. एच. – ४० / सी. ए. ५१५६ व विना क्रमांकाची ट्रॉली या वाहनाने अवैध्यरित्या रेती(वाळु)घेवुन खात कडे येत आहे. अश्या मिळालेल्या खबरेवरून अवैध रेती (वाळु)वाहतुक करणाऱ्यांवर कार्यवाही करणे साठी पोलिस पथकासह रवाना झाले. फिर्यादीला त्याच्या दिशेने
समोरून एक ट्रॅक्टर ट्रॉली येतांना दिसली. सदर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकास थांबण्याचा इशारा केला असता, त्याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉली रोडच्या बाजुला लावली व ती ट्रॅक्टर ट्रॉली तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेवून तो पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. घटनास्थळी ट्रॅक्टर ट्रॉलीची पाहणी केली असता एक निळया रंगाचा पाँवर ट्रक कंपनीचा ट्रॅक्टर (मुंडा) क्र. एम. एच. ४० / सी.ए.- ५१५६ व विना क्रमांकाची निळया
रंगाची ट्रॉली दिसून आली. त्या ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास रेती(वाळु)भरलेली दिसून आली. नमुद ट्रॅक्टर (मुंडा) क्र. एम.एच.
४० / सी.ए.- ५१५६ किंमती अंदाजे ३,००,००० /- रू., विना क्रमांकाची ट्रॉली किंमती अंदाजे १,५०,००० /- रू. व त्यामध्ये भरून असलेली एक ब्रास रेती अंदाजे ३,००० / – रू. असा एकूण ४,५३,००० / – रू. चा मुद्देमाल घटनास्थळावरून ताब्यात घेवून जप्त करण्यात आला.


तसेच आरोपी चालक व मालक हिरामन ढेकल गिरीपुंजे, वय
३९ रा. खात यांचेविरूध्द पोस्टे अरोली येथे कलम ३७९, १०९ भा.दं.वि. सहकलम ४८ (७), ४८ (८), महा. जमिन महसुल अधि. १९६६, सहकलम ४, २१ खाण आणि खनिज अधि. १९५७, सह कलम ३ सार्व. संपत्ती नुकसान प्रति. अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार (भा.पो.से), अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात अरोली येथील ठाणेदार निशांत फुलेकर पोहवा मनोज जयस्वाल यांनी केली.



