सहा पोलिस अधिक्षक यांचा देवलापार पोलिस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावर छापा,२७ जुगारींसह साहीत्य केले जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सहा पोलिस अधिक्षक यांचा देवलापार पोलिस स्टेशन हद्दीत पोल्ट्री फार्म वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, २७ जुगारीसह   नगदी २,९९,१९०/- रू तसेच १ दुचाकी व ११ चारचाकी वाहनासह एकुण ५९,१६,१९०/- रू मुद्देमाल जप्त….

देवलापार(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांनी सर्व प्रकारचे अवैध गुन्हे यांचेवर कडक कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि ९ फेब्रुवारी रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी सावनेर अनिल म्हस्के यांना गोपनिय माहीती मिळाली की, पोलिस स्टेशन देवलापार हद्दीमध्ये मुकनापुर गावाकडे जाणाऱ्या रोडवरील गणेश शरणागते यांच्या शेतातील पोल्ट्री फार्मचे शेडमध्ये काही ईसम जुगार खेळत आहे. सदर प्राप्त माहीतीनुसार त्यांनी तात्काळ सदरची माहीती  पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार  यांना दिल्याने त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहा पोलिस अधिक्षक  अनिल म्हस्के यांनी सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर, खापा, केळवद येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले. व सदर पथकासह घटनास्थळी रवाना होऊन मिळालेल्या माहीतीनुसार गणेश शरणागते यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म शेडमध्ये लाईट च्या उजेडात बरेच इसम दिसले त्यापैकी काही पोल्ट्री फार्म शेड च्या बाहेर टेहाळणीकरीता उभे होते. त्यापैकी एकाला पोलिसांबाबत संशय आल्याने त्याने आरडा ओरडा केल्याने काही इसम पळुन गेले तरी सुध्दा पोलिसांनी शिताफिने २७ जुगारी इसमांना जागीच पकडले.





यातील आरोपी -१) अर्जुन गणेशराम मेश्राम, वय ३५ वर्ष रा पंप हाउस वार्ड क २ भाटेरा चौकी बालाघाट याला ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये ८४००/- रू रोख व एक विवो कंपनीचा मोबाईल मोबाईल मिळुन आला. आरोपी क २) दिपक मंजु सनोडीया, वय २६ वर्ष रा. गोरावाडी वार्ड, चौराई, जि छिंदवाडा मध्यप्रदेश यांचे ताब्यातुन कि १०,२००/- रू रोख, एक विवो कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला. आरोपी क ३) ओमप्रकाश मथुराप्रकाश शर्मा, वय ५२ वर्ष, रा शिवमंदीर जवळ, वार्ड क १४ परासिया छिंडवाडा, म.प्र यांचे जवळुन रोख ९३००/- रू आणि एक रेड मी कंपनीचा मोबाईल मिळुन आले. आरोपी क ४) विनोदकुमार श्यामलाल सोनकेसरिया, वय ४२ वर्ष रा. रा वार्ड क २४, बेहरोगंज सिवनी यांचे ताब्यातुन ८५००/- रू व एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला. आरोपी क ५) माधव सदुलाल डेकाटे वय ४५ वर्ष रा भैरवगंज, सिवनी, म.प्र. यांचे ताब्यातुन १२,१००/- रू आणि एक विवो कंपनीचा मोबाईल मिळुन आला. आरोपी क ६) योगेश नेमसिंग रघुवंशी, वय ५० वर्ष, रा. वार्ड क १२, परासिया, छिंदवाडा, म.प्र यांचे ताब्यातुन रोख ७३००/- रू तसेच एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आरोपी क ७) प्रभु शंकरलाल मडावी, वय २४ वर्ष रा. वार्ड क १ वडांबा, देवलापार यांचे ताब्यातुन ४३५०/- रू मिळुन आले, आरोपी क ८) प्रमोद रामदास भुरे वय २९ वर्ष रा. ताळेश्वर वार्ड क १ पवनी जि भंडारा यांचे ताब्यातुन ९०२०/- व एक विवो कंपनीचा मोबाईल ९) अंकीत अण्णाजी तिघरे, वय २२ वर्ष, रा. सुभाष वार्ड, खैरी दिवान, ता पवनी जि भंडारा यांचे ताब्यातुन ५०४०/- रोख व एक विवो कंपनीचा मोबाईल फोन आरोपी क १०) खुशदीप मनोहर वंजारी, वय २१ वर्ष, रा भेंडाळा, तह. पवनी जि भंडारा यांचे ताब्यातुन ७८००/- रू आणि एक विवो कपंनीचा मोबाईल फोन, आरोपी क ११) विरेंद्र अवधेश श्रीवास्तव, वय ५२ वर्ष, रा. शास्त्री वार्ड क ४ सिवनी म.प्र यांचे ताब्यातुन ४२००/- रू रोख व एक रेडमी कंपनीचा मोबाईल, आरोपी क १२) सतिष शरद उईके, वय २२ वर्ष, रा वडांबा, देवलापार, यांचे ताब्यातुन ५७००/- व एक विवो कंपनीचा मोबाईल फोन, १३)विशाल जमुनाप्रसाद पांडे, वय ३२ वर्ष, रा. वडांबा, ता रामटेक यांचे ताब्यातुन ४१००/- रू व एक विवो कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आले आरोपी क १४) सद्दाम कुरेशी मतीन कुरेशी, वय ३२ वर्ष रा. वार्ड क १४ वारासिवनी जि. बालाघाट म.प्र यांचे ताब्यातुन ५१००/- व एक रेडमी कंपनीचा मोबाईल १५) शशी ओमप्रकाशसिंग राजपुत वय ३४ वर्ष रा. पी.जी. कॉलेज चे समोर भैरव गंज सिवनी ता. सिवनी जि. सिवनी म.प्र. यांचे ताब्यातुन ६२७० /- रोख व एक विवो कंपनीचा मोबाईल फोन आरोपी क १६) ओमप्रकाश तिलकसिंग नागपुरे, वय ५० वर्ष रा वार्ड क २ बालाघाट म.प्र यांचे ताब्यातुन ७३९०/-रू आणि एक रेडमी कपंनीचा मोबाईल फोन, आरोपी क १७) अस्लम सलीम खॉन, वय ३८ वर्ष, रा. वार्ड क १७ कुमारी मोहल्ला बालाघाट म.प्र यांचे ताब्यातुन १०५६०/- रू रोख मिळुन आली आरोपी क १८) मनोज तेजलाल पारधी, वय ५५ वर्ष रा, वार्ड क २ भटेरा चौकी, बालाघाट म.प्र यांचे ताब्यातुन ६९१०/- व एक रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन, आरोपी क १९) नामे- लक्ष्मण कंठेरी गायकवाड, वय ७४ वर्ष रा. वार्ड क २ गुरईया ता.जि छिंदवाडा म.प्र यांचे ताब्यातुन ७००/- व एक लावा कंपनीचा मोबाईल २०) जयकुमार मानकलाल सुर्यवंशी, वय ५७ वष, रा. बटका खापा ता. हर्रई जि. छिंदवाडा म.प्र.यांचे ताब्यातुन ९५००/- व एक रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन आरोपी क २१) मनिष काशीराम सेन, वय २५ वर्ष, रा गाटरवाडा जि. नरसिंगपुर म.प्र. यांचे ताब्यातुन ६२००/- रू आणि एक रिअल मी कपंनीचा मोबाईल फोन, आरोपी क २२) नितेश आसाराम डेहरिया, वय २३ वर्ष, रा. बटका खापा ता. हर्रई जि. छिंदवाडा यांचे ताब्यातुन ८३७०/- रू रोख मिळुन आणि एक रिअल मी कपंनीचा मोबाईल फोन, आरोपी क २३) नुरेन्द्र टोरमल पटले वय ३० वर्ष, रा. हट्टा ता. जि. बालाघाट म.प्र., यांचे ताब्यातुन ७२००/- व एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, २४) राहुल सोमचंद कावरे वय २३ वर्ष रा. बटका खापा. ता. हर्रई जि. छिंदवाडा यांचे ताब्यातुन ६१०० /- रोख व एक विवो कंपनीचा मोबाईल फोन आरोपी क २५) मोहम्मद ईमराम शेख ईदु य ३६ वर्ष, रा. न्युटन चिकली त्रिमुर्ती चौक वार्ड नं. ३ परासिया ता. परासिया जि. छिंदवाडा म.प्र. यांचे ताब्यातुन २०,३००/-रू आणि एक सॅमसंग कपंनीचा मोबाईल फोन, आरोपी क २६) योगेन्द्र जयकिसन बिसेन वय ३२ वर्ष रा. दुल्हापुर ता. बरघाट जि. सिवनी म.प्र यांचे ताब्यातुन ८१००/- रू रोख मिळुन आणि एक इन्फीनिक्स हॉट कपंनीचा मोबाईल फोन, आरोपी क २७) विरेन्द्र प्रेमलाल ठाकरे वय ३२ वर्ष रा. गंगेरवा धपारा ता. बरघाट जि. सिवनी म.प्र. यांचे ताब्यातुन ४०००/- व एक नोकीया कंपनीचा मोबाईल फोन, तसेच वरील इसमांच्या समोर ५२ तासपत्त्यांचे एकुण ५ नग व डावामध्ये मांडलेले नगदी रूपये १,००,०८०/-मिळुन आले याप्रमाणे एकुण नगदी रूपये २,९९,१९०/- मिळुन आल्याने ते पंचांसमक्ष जप्त केले.



तसेच घटनास्थळाच्या बाहेर उभ्या असलेले वाहन क. १) एक महिन्द्रा स्कार्पिओ चारचाकी गाडी क्र. एम एच ३१ डिके ५४०१ क २) एक महिन्द्रा स्कार्पिओ एन चारचाकी गाडी क्र. एमपी ०४ झेड एक्स ५४९३ क ३) एक मारूती स्वीफ्ट डिझायर चारचाकी गाडी क्र. एमपी २८ सीए ४५४७ क ४) एक हयुंडाई एक्सएन्ट चारचाकी गाडी क्र. एमएच ४७ एन १९१७ क ५) एक महिन्द्रा झायलो चारचाकी गाडी क्र. एमपी ०९ बीसी ३१९० ६) एक हयुंडाई आय २० चारचाकी गाडी क्र. एमपी ५० सी ६००० ७) एक मारूती सुझुकी अर्टीगा चारचाकी गाडी क्र. सीजी ०४ एचजे ९४५५ क ८) एक टाटा नेक्सॉन चारचाकी गाडी क्र. एमपी ५० सी ८५९१ क ९) एक महिन्द्रा झायलो चारचाकी गाडी क्र. एमपी ह ५० बीसी ०८१९ क १०) एक टाटा झेस्ट चारचाकी गाडी क्र. एमपी ५० झेड डी ४५३८ क ११) एक टाटा झेस्ट चारचाकी गाडी विना नंबर प्लेटची क १२) एक होन्डा अॅक्टीवा कंपनीचा मोटरसायकल क्र. एमएच ४० सी एल ९७८५, तसेच एक विवो कंपनीचा काळया व लाल रंगाचा रू. १०००० किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट मिळुन आला. याप्रमाणे सदर घटनास्थळी एकुण रूपये ५९,१६,१९०/- चा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त केला. सदरचे घटनास्थळ हे गणेश मधुकर शरणागते यांच्या मालकीचे असल्याची प्राथमीक माहीती पोलिसांना हाती लागली.



सदर प्रकरणात पोलिस निरीक्षक  विशाल गिरी पोलिस स्टेशन खापा यांचे रिपोर्टवरून पोलिस स्टेशन देवलापार येथे भारतीय न्याय संहिता कलम ११२ सहकलम म.जु.का. कलम ४ व ५ अन्वये अन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास देवलापार पोलिस करीत आहे. कलम ११२ भान्यास मधील किरकोळ संघटीत गुन्हेगारी या कलमानुसार तपास करण्याचे प्रस्तावीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी सावनेर अनिल मस्के यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत पोलिस निरीक्षक पोस्टे खापा  विशाल गिरी,परीविक्षाधीन महाला पोउपनि पोस्टे केळवद,मनीषा चव्हान पोस्टे खापा तसेच उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय सावनेर,पोलिस स्टेशन सावनेर पोलिस मुख्यालयातील आसीपी पथक यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!