सहा.पोलिस अधिक्षक अनिल मस्के यांची अवैध धंद्यांवर धाडसत्र …

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर यांची सावनेर उपविभागातील अवैध धंदेवाईकांवर धाडसत्र मोहीम….

सावनेर(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनात त्यांचे पथकाने दि. ०८/३/२०२४ रोजी अवैध धंद्यावर धाडसत्र मोहीम राबविली.





@पोलिस स्टेशन खापा हद्दीमध्ये लोकांकडुन पैसे घेवुन वरली मटक्याचे सट्टीपट्टीचे आकडे लिहून जुगार खेळ खेळविणारे १)
पतीराम कृष्णाजी बारापात्रे २) मनोज शिवराम बावणे ३) संजय शिवराम बावणे ४ ) शांताराम शिवाजी पवार ५)जागेश्वर रमेश ठोसरे सर्व रा. खापा कारवाई केली असुन त्यांचेकडुन सट्टापट्टीचे साहीत्य, वेगवेगळे मोबाईल व नगदी असा एकुण ११८१५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलिस स्टेशन खापा येथे आरोपीं विरूध्द गुन्हे नोंद करण्यात आले आहे.सदरची कार्यवाही ही वरीष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मिलींद गेडाम, पोलिस हवालदार नरेश गाते,अनिल मुंढे, पोलिस शिपाई नितेश पुसाम यांनी केलेली आहे.



@पोलिस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील गोंडखैरी परिसरातील हॉटेल अॅटमॉस फिअर दी हायवे अॅग आउट येथे अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनिय माहीती मिळाल्यावरून दि. ०९/०३ /२०२४ चे पहाटे दरम्यान सदर ठिकाणी धाड टाकली असता तेथे काही ईसम हुक्का पितांना मिळुन आल्याने सदर ठिकाणाहुन हुक्का पार्लरचे साहित्य एकुण किंमती ६७,६७०/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे १) संघदीप मोरेश्वर मेश्राम रा. गिट्टीखदान नागपुर २ )
अजय शामराव गजभिये रा. ८ वा. मैल मंडपे ले आउट नागपुर ३) दिपक राजेन्द्र उरकुडे रा. खैरी पन्नासे ता. हिंगणा ४) असलम उर्फ राजा अशफाक खान रा. बोरगाव दिनशा फॅक्ट्री ५) डॅनिस वारेन रा. मानकापुर यांचेविरूध्द पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे कलम ४ (अ), २१ (अ) कोपा अॅक्ट सहकलम १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही ही वरीष्ठांचे मार्गदर्शनात पोउपनि दत्तात्राय कोलटे, विवेक गाडगे यांनी केलेली आहे.



@उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर यांची सावनेर यांची अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंद दि. ०९/०३/२०२४ चे पहाटे दरम्यान १४ चक्का ट्रक क्र. एम. एच. ४० सी.एम. २६९९ मध्ये १३ ब्रास रेती व ट्रक क्र. एम. एच. ४० सी. क्यु १८०४ मध्ये १३ ब्रास रेती (गौणखनिज) वाहनाचे कोणतेही मुळ कागदपत्रे न बाळगता अवैधरित्या विना रॉयल्टी चोरीचे रेतीची वाहतुक करतांना मिळुन आल्याने दोन्ही ट्रक रेती व वेगवेगळया
कंपनीचे मोबाईल असा एकुण ४१,५१,०००/- रू. जप्त करून आरोपी नामे- १) विनोद प्रल्हाद धुळे रा. भुगाव ता.अचलपुर जि. अमरावती २) देविदास मन्नुजी गजाम, रा. पंढरी ता. वरूड जि. अमरावती ३) शेख नईम रा. जरूड ता. वरूड जि. अमरावती ४) राजेश प्रल्हाद धुळे रा. रा. भुगाव ता. अचलपुर जि. अमरावती ५) राजकुमार गोमाजी वाघमारे रा. सालईपुर ता. अचलपुर जि. अमरावती ६) शेख फय्याज शेख निसार, रा. जरूड ता. वरूड जि. अमरावती यांचेविरूध्द पोलिस स्टेशन सावनेर येथे कलम ३७९, १०९, ३४ भादंवि सहकलम ४८ (८) गौण खनिज अधिनियम
सहकलम १३० / १७७ मोवाका सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला आहेत.सदरची कार्यवाही ही वरीष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रविंद्र मानकर ठाणेदार पो. स्टे. सावनेर पोहवा राजेश हावरे, पोना कपोल तभाने, पोशि किशोर राठोड यांनी केलेली आहे.

सदरचे सर्व कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा.पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!