कळमेश्वर हद्दीत गोंडखैरी पारधी बेड्यावर नागपुर ग्रामीन पोलिसांची वॅाश आऊट मोहीम…
कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत गोंडखैरी पारधी बेडा येथे अवैध मोहा हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखा व सहा.पोलिस अधिक्षक,सावनेर यांचे पथकाचा छापा….
कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, येणारा होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेश दिले होते त्यानुसार दिनांक १२/०३/२०२४ रोजी पोस्टे कळमेश्वर हद्दीत मौजा गोंडखैरी पारधी बेडा व शिवार येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोलिस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील मौजा गोंडखैरी पारधी बेडा व शिवार येथे सुरू असलेल्या मोहाफुल गावठी दारू भट्टीवर रेड केली असता एकुण १४ महिला आरोपी यांचे ताब्यातून १) २४० लिटर
मोहाफूल गावठी दारू ५० रू लिटर प्रमाणे किंमती ४८०० /- रू. २) १०,३२० लिटर मोहाफूल सळवा रसायन कि.२० रु लिटर प्रमाणे २,०६,४००/- रू. ३) प्लास्टिक ड्रम व इतर साहित्य किमती ३७,८००/- रू असा एकुण किंमती २,४४,२००/- रू चा मुदेमाल जप्त करून एकुण १४ महिला आरोपीतांवर पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे गुन्हे नोंद करण्यात आले असुन.जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलिस ठाणे कळमेश्वर यांचे ताब्यात देवून वरील आरोपीं विरूद्ध वेगवेगळे कलम ६५ फ, ब, ई म.दा.का अन्वये एकूण १४ गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर, अनिल मस्के, परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक दिपक अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि. आशिषसिंग ठाकुर, दिपक कॉक्रेटवार, पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बट्टुलाल पांडे, स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील पोलिस उपनिरीक्षक मनोज टिपले, महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी काकडे, आरसीपी पथक यांनी पार पाडली.