अरोली पोलिसांची हद्दीतील जुगार अड्ड्यावर छापा,जुगारींसह लाखोचा मुद्देमाल जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अरोली हद्दीतील तीन जुगार अड्डयावर अरोली पोलिसांचा छापा,१५ जुगारींसह लाखोचा मुद्देमाल जप्त…

अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५)सप्टेंबर  २०२४ रोजी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास पोलिस स्टेशन अरोलीचे अधिकारी स्टॉफ सह पोलिस स्टेशन अरोली हद्दीत पेट्रोलींग करित असतांना गोपनीय माहीती मिळाली की विविध हद्दीत विविध ठिकाणी ५२ तास पत्याचा जुगार खेळ पैसे लावुन खेळत असल्याचे खात्रीशीर माहीती वरुन ठाणेदार पोलिस स्टेशन अरोली सपोनि स्नेहल राऊत यांच्या आदेशावरून पोउपनि सोनवने, सफौ. जाधव, पोहवा बाजनघाटे, पोकळे, बगमारे यांनी सापळा रचुन मौजा मसला (टोली) येथे सुर नदीच्या बाजुला असलेल्या मारोती चौधरी यांचे पाणठेल्या जवळील वडाच्या झाडाखाली काही लोक ५२ ताश पत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याचे दिसल्याने शिताफीने जावुन छापा टाकण्यात आला असता पोलीसांना पाहुन पळुण जाण्याच्या  प्रयत्न करणारे  त्याचा पाठलाग करून ५ इसमांना पकडण्यात पोलीसांना यश आले त्यामध्ये १)काशीनाथ मथुरे, २)विठ्ठल मोहनकर, ३)मारोती हटवार, ४)जगदिश हटवार, ५)मारोती चौधरी यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याकडुन घटना स्थळावरून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या त्यामध्ये तीन दुचाकी किंमत एकुण १,२५,०००/- रू. तीन मोबाईल किंमत एकूण ११,०००/- रू. आणि नगदी ३५९०/- रू. तसेच पत्ते ५०/- रू. असा एकुण १,३९,६९०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





त्याचप्रमाणे मौजा मसला, मौजा किरणापुर येथे सुध्दा जुगार खेळणाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या त्यामध्ये मसला येथे दुसऱ्या छाप्यात १) किसना सयाम, २) शुभम चौधरी, ३) अरूण चौधरी, रमेश सयाम, ४) सचिन हटवार यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन चार अॅन्ड्रॉईड मोबाईल फोन किंमत एकुण २०,०००/- रू. नगदी रक्कम २२३०/- रू. पत्ते ५०/- रूपये असे एकुण २२,२८०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



तसेच तिसरा छापा मौजा किरणापुर येथे जुगार खेळणाऱ्यांवर टाकण्यात आला त्यामध्ये १) राजु पिसे, २) भिवा हटवार ३) नरेंद्र घरडे ४), विलास डोंगरे, ५) गुलाब कळवे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन एक दुचाकी किंमत २५,०००/- रू. दोन अॅन्ड्रॉईड मोबाईल किंमती अंदाजे १०,५००/- रू. एकुण नगदी ३३६०/- रू. ताशपत्ते ५०/- रू असा एकुण ३८९१०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



वरिल प्रमाणे अरोली पोलिस स्टेशन हद्दीत तीन यशस्वी जुगार रेड करून नगदी एकूण ९१८०/- रुपये, ९ मोबाईल किंमती एकुण ४१,५००/- रू तसेच एकुण चार मोटर सायकल किंमती एकुण १,५०,०००/- रू. व बावन ताशपत्तेचे चार कॅट एकुण किंमती २००/- रू. असा एकुण २,००,८८०/- रूपयाचा मुद्देमाल वरिल एकुण १५ आरोपीकडुन जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक  हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक  रमेश बरकते यांचे मार्गदर्शनात पोस्टे अरोली ठाणेदार सपोनि स्नेहल राऊत, पोउपनि सोनवने, सफौ जाधव, पोहवा बाजनघाटे, पोहवा पोकळे, पोहवा बगमारे, पोशि राकेश, विक्की, मुदनर, सुखदेवे, परसगाये, होमगार्ड सैनिक यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!