उमरेड पोलिसांनी अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे ७ गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन त्याने त्याचे साथीदारांसह केलेले ७ घरफोडीचे गुन्हे उमरेड पोलिसांनी केले उघड,४ आरोपी ताब्यात…

उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ डिसेंबर ते ०६ डिसेंबर चे रात्री दरम्यान उमरेड शहरामध्ये एका बंद घरी झालेली चोरी  तसेच काही दुकाणांचे शटर फोडल्याची व उदासा येथील ईंडीया वन कंपनीच्या ए. टी. एम मशीनला लक्ष करून तेथील रोख रक्कम चोरी करुन नेण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला होता. सदर दोन्ही घटने संबंधाने पोलिस स्टेशन उमरेड येथे अनुक्रमे (१) अप क्र. ५९६/२०२४ कलम ३३१(४), ३०५, ३२४(४) भा.न्या.सं. (२) अप. क्र. ५९५/२०२४ कलम ३०३(२), ३२४(४), ६२ भा.न्या.सं. अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.





या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने व त्यांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस स्टेशन उमरेड हद्दीतीस चोरीचा उलगडा करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रभारींना दिल्या होत्या त्यावरुन पोलिस स्टेशन उमरेड येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन्ही घटनेच्या आरोपी अनुक्रमे (१) असलम अब्दुल शरीफ खान वय २१ वर्ष, रा. यशोधरा नगर नागपुर (२) पुर्वेश दिलीप खवसे वय २१ वर्ष रा. वडचीचोली जि. पांढुर्णा (म.प्र.). (३) सार्थक मनोहर नेहारे वय २२ वर्ष रा. वडचिचोली जि. पांढुर्णा (म.प्र) (४) गोलू शेखर लारोकर, वय १९ वर्ष, रा. पारडी नागपुर यांना सखोल कौशल्यपुर्ण तपास तसेच सिसिटिव्ही विश्लेशन द्वारे निष्पन्न करुन १२ तासाच्या आत ताब्यात घेतले



त्यांना ताब्सात  घेवुन दिनांक ०६/१२/२०२४ रोजीचे रात्री दरम्यान अटक करण्यात आली होती. अश्याच प्रकराच्या घटना पोलिस स्टेशन भिवापुर, लाखांदूर जि. भंडारा, ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर येथे सुध्दा  घडल्या असल्याने तीथे सुध्दा अनुक्रमे (१) पोस्टे भिवापुर अप. क्र. ५५२/२०२४ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा.न्या.सं., (२) पोस्टे. लाखांदूर जि. भंडारा अप. क्र. ३६९/२०२४ कलम ३३१ (४), २३८, ६२, ३०५ भा.न्या.स. (३) पो.स्टे. ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर अप. क्र. ५६९/२०२४ कलम ३३४ (१), ३०५ (अ), ३ (५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हे दाखल होते व नमुद आरोपी यांनी ते सुध्दा गुन्हे केल्याची कबुली दिल्याने वरील प्रमाणे एकुण ५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते.



वर नमुद आरोपी पैकी असलम अब्दुल शरीफ खान हा सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी असुन त्याच्या विरुद्ध नागपुर शहर येथे यापुर्वी सुध्दा चोरी सारखे गुन्हे नोंद आहेत व त्याला अटक सुध्दा करण्यात आली होती. त्यामुळेच तो नागपुर जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या करुन मागील काही काळापासुन स्वतःची ओळख लपवुन काटोल येथील सावरगाव येथे राहत असल्याची पोलिसांना चाहुल लागताच व तेव्हाच वरील प्रमाणे अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी मध्यप्रदेश येथील आरोपीसंह त्याची ओळख झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने दिवाळीच्या एक दिवस आधी उदासा येथे यातील  आरोपो पूर्वेश दिलीप खवसे (म.प्र.) याच्या सह एका उदासा येथील एका घरात घरफोडी केल्याचे सांगीतले. सदर घटने संबंधाने पोलिस स्टेशन उमरेड येथे तक्रारदार  दिपक संतोषराव बागडे यांच्या तोंडी रीपोर्ट वरून अप क्र. ५३१/२०२४ कलम ३३१ (३) ३३१ (४) ३०५ (अ) भा.न्या.सं. दिनांक ०१/११/२०२४ अन्वये नोंद होता.

त्यावरुन दोन्ही आरोपी कडून गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. असुन तसेच मुख्य आरोपी असलम अब्दुल शरीफ खान याने खापरखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत सुध्दा एका बंद घरी चोरी केल्याचे सांगत असुन त्याच्या कडुन पुन्हा जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याचे शक्यता आहे. नमुद सर्व आरोपी यांच्या कडुन वरील प्रमाणे पोलिस स्टेशन उमरेड येथे दाखल असलेल्या गुन्हयाच्या संबंधाने एकुण ३,३४,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,उमरेड ऋुष्टी जैन यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पेलिस स्टेशन उमरेड पोलिस निरीक्षक धनाजी जळक,पोहवा राधेशाम कांबळे,प्रदिप चवरे,नापोशि पंकज बट्टे,पोशि चेतन माहुलकर,गोवर्धन सहारे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!