
अट्टल घरफोडी करणारे ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….
घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करुन,मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….
नागपुर( प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सावनेर हद्दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात घरफोडी च्या संदर्भात दाखल गुन्हयाचे समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते


त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून तपासाच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींबाबत माहीती घेत शोध करित असतांना दि. २३/०९/२०२४ रोजी विश्वसनीय बातमीदाराकंडुन गोपनीय माहीती मिळाली की,संशईत ईसम मोहम्मद शाबीर उर्फे साबु व त्याचा साथीदार आशिक रजा हे एका विना नंबरचे पांढऱ्या रंगाचे सुझुकी बर्गमन या मोपेड गाडीने गुन्हयातील चोरी केलेले मुदेमाल विकण्याकरिता कोराडी, खापरखेडा भागाने फिरत आहेत.

अश्या माहीतीवरून परस्पर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी खापरखेडा ते कामठी रोड बिना संगम टी पॉईन्ट येथे स्टॉफचे मदतीने सापळा रचुन नाकांबदी केली असतांना अंदाजे १.३० वा. विना नंबरचे पांढऱ्या रंगाचे सुझुकी बर्गमन या मोपेड गाडीने दोन इसम आरोपी क्र. १) मोहम्मद शब्बीर उर्फे सब्बु वल्द मोहम्मद अयुब खान वय २४ वर्षे, रा. टिप्पु सुलतान चौक, पिली नदी यशोधरा नगर नागपुर ०२) आशिक रजा वल्द अयुब रजा अन्सारी वय २३ वर्षे रा. टिप्पु सुलतान चौक, मेहबुब पुरा यशोधरा नगर नागपुर हे कामठी ते खापरखेडा रोड, विना संगम टी पॉईन्ट कडे येतांना दिसुन आल्याने त्यांना स्टॉफचे मदतीने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपी क्र १ मोहम्मद शब्बीर उर्फे सब्बु वल्द मोहम्मद अयुब खान यांने सांगीतले की, त्याला नशा करण्याचे व्यसन असल्याने त्या व्यसनामुळे त्याचे अंगावर लोकांचे कर्ज झाले होते व आरोपी क्र ०२ आशिक रजा वल्द अयुब रजा अन्सारी याने त्याला शौक पाण्याकरिता पैशाची अडचण असल्याने चोरी केल्याचे सांगितले. आरोपी क. ०१ जवळुन सोन्याचांदीचे दागिने तसेच आर्टीफिशीयल दागिने, ०७ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमती ४०,०००/- रू., निकॉन कंपनीचा कॅमेरा, लेन्स, चार्जर, बॅगसह किंमती ५०,०००/- रू., एक पांढऱ्या रंगाची विना क्रमांकाची सुझुकी कंपनीची बर्गेमन मोपेड गाडी किंमती ९०,०००/- रू., नगदी १५,०००/- रूपये असा एकुण ३,६०,२२०/- रू.व आरोपी क्र. ०२ यांचेकडुन नगदी २०,०००/ रूपये एक ओप्पो कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल किंमती १०,०००/रू मुद्देमाल एकुण ३०,०००/- रू. असा एकुण दोन्ही आरोपीकडुन ३,९०,२२०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालासह आरोपी गुन्हयाचे पुढील तपास कामी पोलीस स्टेशन कळमेश्वरचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता या दोन्ही आरोपींचा खालील गुन्ह्यांत सहभाग आढळु आला १) पो. स्टे. कळमेश्वर अप क्र ८१८/२०२४ कलम ३३१ (४), ३०५ (A) BNS २) पो. स्टे. कळमेश्वर अप क्र. ८१७/२४ कलम ३३१(३), ३०५(A) BNS

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा पोलिस निरीक्षक किशोर शेरकी, आशिष ठाकुर, सचिन लेडांगे फिंगरप्रिंट विभाग, पोहवा दिनेश आधापुरे, संजय बांते, ईकबाल शेख, पो.हवा प्रमोद भोयर, पो.शि. संजय बरोदिया, मपोहवा रामटेके, चापोहवा शुक्ला, चापोहवा अमोल कुथे, पोअं सुमित बांगडे, सायबर सेलचे नापोशि सतिश राठोड यांनी पार पाडली.


