वयोव्रुध्द महिलांची आर्थिक फसवनुक करणाऱ्या आंतराज्यिय टोळीतील सदस्यास LCB ने शिताफिने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वयोवृध्द महिलांना गंडा घालून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

नागपूर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील वयोवृध्द महिलांना गंडा घालून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील एका सदस्याला मिळालेली गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर शिताफिने स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी अटक करून १६ हजार ३०० रु. मुद्देमाल जप्त करून ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.





या बाबत मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण घटकात वयोवृध्द महिलांना गंडा घालून त्यांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांची टोळी मागील काही दिवसांपासून सक्रिय झाली होती. या टोळीतील गुन्हेगार वयोवृध्द महिलांना एकटे गाठून त्यांना पैशांचे आमिश दाखवून त्यांचे अंगावरचे दागीने हात चालाखीने उतरवीत असायचे व संधी साधून पसार व्हायचे. नागपूर ग्रामीण जिल्हयात मागील एक महिन्यांपासून कळमेश्वर, काटोल, खापरखेडा, मौदा या ग्रामीण भागात वयोवृद्ध्द महिलांना गंडा घालून त्यांचे दागीने पळविल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोहार यांनी अशा गुन्हेगारांचा छडा लावण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे विशेष तपास पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक मागील एक महिण्यांपासून अश्या अपराध्यांच्या शोधात होते. या दरम्यान (दि.१७ऑगस्ट) रोजी त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, कळमेश्वर आणि फेटरी येथे वृध्द महिलांना गंडा घालून त्यांचेकडील सोन्याचे दागीणे पळविणाऱ्या टोळीतील बबलू बिरचंद सोळंकी (वय २६ वर्ष), रा.प्लॉट नं. १४५, अध्यापक नगर, महल्ले सभागृह समोर, मानेवाडा रिंगरोड, नागपूर हा कळमेश्वर मध्ये फिरत आहे. त्यावरुन बबलू सोळंकी याला कळमेश्वर येथून ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे इतर तिन साथीदार १) हरि गंगाराम राठोड (वय ४५ वर्ष), रा.नोबल नगर, अहमदाबाद गुजरात ह.मु. ग्राम वरसल, मांजलपूर जि. वडोदरा, गुजरात, २) मुकेश बाबुलाल राठोड, (वय २० वर्ष), रा.नोबल नगर, अहमदाबाद गुजरात आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांचे सोबत मिळून कळमेश्वर, काटोल, खापरखेडा आणि मौदा हद्दीत काही वृध्द महिलांना गंडवून त्यांचे जवळील सोन्याचे दागीने लबाडीने प्राप्त केले व घटनास्थळाहुन पसार झाल्याची माहिती दिली. बबलू सोळंकी याचे साथीदार गुन्हा केल्यानंतर गुजरात राज्यात पळून जात असल्याची माहिती बबलू कडून प्राप्त झाली.



बबलू सोळंकी याचे ताब्यातून ६ नग सोन्याचे मनी, १ डोरल वजन अंदाजे १ ग्रॅम, ८००/- रुपये रोख आणि गुन्हयात वापरलेला मोबाईल फोन असा एकुण १६,३००/- रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला. सदर आंतरराज्यीय टोळीने नागपूर ग्रामीण जिल्हयात एकुण ०४ गुन्हे केल्याचे उघडकीस झाले आहे. या व्यतिरीक्त सदर टोळीकडून इतरही जिल्हयातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.



सदर कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक हर्ष पोहार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा.पोलिस निरीक्षक किशोर शेरकी, आशिषसिंह ठाकुर, पोलिस हवालदार दिनेश आधापूरे, ईक्बाल शेख, राजेन्द्र रेवतकर, रोशन काळे, संजय बान्ते, प्रमोद भोयर, नितेश पिपरोदे, पोलीस नायक संजय बरोदिया, सतिष राठोड चालक पोहवा. अमोल कुथे, पोशि आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!