पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा कन्हान येथील जुगार अड्ड्यावर छापा…
पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचा पोलिस स्टेशन कन्हान हद्दीत जुगार अड्डयावर छापा….
कन्हान(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि (२७) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील कन्हान पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की,कन्हान हद्दीत मच्छी मार्केट मध्ये जयस्वाल भट्टीचे मागे मोनु यादव हा आपले बंद पडलेल्या साई लॉट्री दुकानासमोर सार्वजनिक रोडवर काही इसमांकडुन पैसे घेवुन कागदावर वर्ली मटक्याचे आकडे लिहुन तसेच ताशपत्त्यावर पैसे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे.
अशा खात्रीशीर माहिती वरून पोस्टे कन्हान हद्दीत स्वामी विवेकानंद नगर कन्हान मच्छी मार्केट मध्ये जयस्वाल भट्टीचे जवळ पोहचुन
साई लॉंट्री दुकानासमोर सार्वजनिक रोडवर जुगार अड्डयावर छापा टाकला असता त्याठिकाणी यातील आरोपी १) रोहीत उर्फ
मोनु रामुजी यादव रा. गवलीपुरा कन्हान २) सुमीत भिमराव कोटांगळे रा. नवीन गोदाम कामठी ३) अमोल देवमंन तिमांडे रा. स्वामी विवेकानंद नगर कन्हान ४) विवेक शांताराम खडसे रा. विवेकानंद नगर कन्हान ५) महेश गंगाधर ठवकर रा. दुर्गा मंदीर मोंढा मोहल्ला कामठी हे हारजितचा जुगार खेळ खेळताना मिळुन आल्याने आरोपींकडुन ०६ वेगवेगळया कंपनीचे अॅन्ड्राईड व किपॅड मोबाईल फोन किंमत १,३४,०००/- रू. २) एक कॅल्क्युलेटर व ५२ तासपत्ते किंमत १०५/- रू. ३) ०७ वेगवेगळया कंपनीचा मोटारसायकल किंमती ४,४०,०००/- रू. ४) नगदी १४,४००/-
रू. असा एकुण जप्त माल किंमती ५,८८,५०५ /- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरूद्ध पोस्टे कन्हान येथे कलम १२, १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम सहकलम ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस
अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेरकी, पोहवा ललीत उईके, नापोशि प्रणय बनाफर, पोशि कार्तिक पुरी, बालाजी बारगुले विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी केली.