दोन संशईतांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी जप्त केल्या ९ मोटारसायकल…
दोन संशईत ईसमांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी ९ मोटारसायकल केल्या जप्त….
कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कळमेश्वर हद्दीत होणार्या सततच्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि.(२१) सप्टेंबर २०२४ रोजी कळमेश्वर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की दोन ईसम परीसरात संशईतरित्या दुचाकीवर फिरत आहे
अशा गोपनीय माहीतीवरुन दोन्ही संशईत ईसमास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव १) तेजस अबर रामावत वय २२ वर्ष रा. ब्राम्हणी बायपास रोड कळमेश्वर २) विक्की उर्फ खुटी रामकृष्ण भलावी वय १८ वर्ष रा. येरला ता. जि. नागपुर असे सांगितले त्याच्या बोलण्यावरुन संशय आल्याने त्याची सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार यांचे साथीने ताब्यातुन पोलिस स्टेशन कळमेश्वर येथील ०१ मोटरसायकल, ०२ पाण्याच्या मोटार पंप, नागपूर शहर हद्दीतील पोलिस स्टेशन बजाज नगर ०१ मोटरसायकल, सिताबर्डी-०१ मोटरसायकल, गिट्टीखदान-०४ मोटरसायकल, हुडकेश्वर-०१ मोटरसायकल, नागपुर शहर व सेलु ०१ मोटरसायकल जि. वर्धा हददीतुन चोरी केल्याचे सांगितले
अशा एकुण ०९ मोटार सायकल व ०२ पाण्याच्या मोटार पंप पोलीसांनी जप्त केल्या असुन त्यामध्ये १) एक काळया रंगाची हिरो कंपनीची स्पेडर प्लस मोटार सायकल क. MH40/CP2636 ज्याचा इंजीन क HA11EAN5M55590 चेचिस नंबर MBLHAW179N5MO5377 २) एक काळया रंगाची होन्डा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल क्र. नंबर प्लेट नसलेली जिचा चेचिस नंबर NE4KC09CCD8517516 इंजीन क. KC09E-8-6526813 ३) एक काळया रंगाची होन्डा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल क. नबर प्लेट नसलेली जिचा चेचिस नंबर NE4KC093C98054031 इंजीन क. KC09E-10-105589 ४) एक काळया रंगाची होन्डा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल क. नंबर प्लेट नसलेली जिचा चेचिस नंबर ME4KC3156K8003849 इंजीन क. KC31E82003958 5) हिरो होंडा सी बी शाईन मोटार सायकल क. MH40/S6825 6) हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क. MH31/BA8594 7) एक काळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर नंबर प्लेट नसलेली चेचिस नंबर 05F16C37702 इंजीन क. 058F15M375128) एक हिरो कपंनीची प्लेझर मोपेट मोटर सायकल इंजिन क्र. JF16EBBGL164019) एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल क. MH49/AN5388 व दोन पाण्याच्या मोटारपंप किंमती ५००० रू. असे पोलीस स्टेशन कळमेश्वर हददीतील ०२ व इतर पोलीस स्टेशन हददीतील ०८ गुन्हे उघड करण्यात आले आहे. सदर गुन्हात एकुण ५,८०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी कडुन आणखी चोरी केलेल्या मोटार सायकल हस्तगत करण्याचे शक्यता असुन गुन्हाचा तपास चालु आहे. .
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी,सावनेर अनिल मस्के यांच्या मार्गदशनाखाली पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे, स.फौ. सुनिल मिश्रा मन्नान नौरंगाबादे, पो.हवा. दिनेश गाडगे, पोशि. विवेक गाडगे, हेमंत बांबुळकर यांनी केली आहे.