
सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांना केळवद पोलिसांनी केली अटक…
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुंगंधीत तंबाखुची तस्करी करणारे दोघे मुद्देमालासह केळवद पोलिसांचे ताब्यात..
नागपूर (प्रतिनिधी) – केळवद पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्णरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 3 लाख 11 हजारांची तंबाखू आणि कार असा एकूण 13 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. शेख शोएब शेख छोटेसाब (वय 26 वर्ष) रा.हसनबाग नागपुर आणि अभिलाष संतोष नामदेव (वय 31 वर्ष) रा.लाभ लक्ष्मी नगर, कलमना, नागपुर हि अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


या बाबत अधिक माहिती अशी की, पोहवा. सुधिर यादगिरे व नापोशि होमेश्वर खडसे, चालक पोहवा रविंद्र साठोणे असे मिळुन सरकारी वाहनाने पोलिस स्टेशन. परीसरात पेट्रोलिंग करीत होउन असतांना गुप्त बातमीदार व्दारे माहीती मिळाली कि, पांढुर्णा (म.प्र.) येथुन नागपुर कडे पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक होत आहे अशी माहीती मिळाल्याने ठाणेदार राकेश साखरकर यांना फोनद्वारे माहीती देऊन ठाणेदार राकेश साखरकर आणि पोहवा. दिनेश काकडे असे सावळी फाटा येथे हजर पोहचले व पांढुर्णा ते नागपुर महामार्गावर सावळी फाटा येथे (दि.07एप्रिल) रोजी 04:00 वा. दरम्यान नाकाबंदी करुन पांढुर्णा कडुन नागपुरच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाची किया कार क्र. एम एच 49 बि.आर. 9406 ही येताना दिसल्याने सदर वाहनास पथकाच्या मदतीने थांबण्याचा ईशारा केला असता वाहन चालकाने आपली कार रोडच्या कडेला थांबवुन सदर वाहन चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव शेख शोएब शेख छोटेसाब (वय 26 वर्ष) रा.हसनबाग नागपुर असे सांगीतले व त्याचे सोबत असलेल्या ईसमाला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अभिलाष संतोष नामदेव (वय 31 वर्ष) रा.लाभ लक्ष्मी नगर, कलमना, नागपुर असे सांगीतले. त्यांना सदर वाहनामध्ये मागे काय आहे याबाबत विचारपुस केली असता वाहन चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये मागच्या सिटवर व डिक्कीमध्ये पिवळ्या रंगाच्या 20 बोऱ्यामध्ये होला हुक्का शिशा तंबाखु चे प्रत्येकी 10 पाउच एकुन 200 पाउच (1 किलो 820/- रु.), पांढऱ्या रंगाच्या 17 बोऱ्या ईगल सुगंधीत तंबाखु चे प्रत्येकी 11 पाउच एकुन 187 पाउच (400 ग्रॅम 640/-रु.), पांढऱ्या रंगाच्या 03 बोऱ्यामध्ये राजश्री पान मसाला चे प्रत्येकि 25 पाउच एकूण 75 पाउच (250 ग्रॅम 340/- रु.), पांढऱ्या रंगाच्या 01 बोरीमध्ये डबल ब्लॅक 18 चे 100 पाउच (30 ग्रॅम 25/- रु.) वरील नमुद महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु एकूण किंमत 3,11,680/- रू व एक किया कार जिची किं. 10,00,000/- रू. असा एकूण 13,11,680/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या सुगंधीत तंबाखु ची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर पुढील कार्यवाही करीता अन्न सुरक्षा अधिकारी, नागपुर यांना पत्रव्यवहार करून अन्न सुरक्षा अधिकारी एस.व्ही. बाभरे या पोलिस स्टेशन केळवद येथे हजर येउन त्यांनी सदर जप्त करण्यात आलेल्या सुगंधीत तंबाखुची पाहणी करून वर नमुद आरोपीवर गुन्हा नोंद होणेकरीता लेखी फिर्याद दिल्याने नमुद आरोपीवर पोस्टे. केळवद येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के, यांचे मार्गदर्शनात सपोनि राकेश साखरकर ठाणेदार पोस्टे. केळवद, पोहवा. सुधिर यादगिरे, नापोशि. होमेश्वर खडसे, चालक पोहवा रविंद्र साठोणे, पोहवा. दिनेश काकडे यांनी केली असुन पुढील तपास सपोनि. राकेश साखरकर ठाणेदार पोस्टे. केळवद हे करत आहेत.


