
अट्टल घरफोड्यास अटक करुन खापरखेडा पोलिसांनी ५ घरफोडीचे गुन्हे केले उघड….
घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला अटक करुन खापरखेडा पोलिसांची केले 5 घरफोडीचे गुन्हे उघड….
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की , दि.13.02.2024 रोजी दुपारी 1.15 वा. ते 1.45 वा. चे दरम्यान फिर्यादी सुरेश शंकर डिगे वय 23 वर्षे रा. वार्ड क्र. 04 खापरखेडा ता. सावनेर याची पत्नी राहते घराला कुलुप लावून अंगणवाडी मधे
मुलीला घेवुन गेली असता कोणीतरी अज्ञात चोराने त्यांचे राहते घराचे समोरील दाराचे कुलूप तोडुन घराचे आत प्रवेश करुन लोखंडी आलमारीमधे ठेवलेले सोने,चांदीचे दागीने चोरुन नेले


अशा फिर्यादीचे तक्रारी वरुन पो. स्टे. खापरखेडा येथे अप क्र. 85 / 2024 कलम 454,380 भादवी अन्वये गुन्हा नोंद असुन तपास सुरु केला असता दरम्यान गुप्त माहीतीच्या आधारे आरोपी नामे 1) प्रविन उर्फ कालु डालीराम पोचपोगडे वय 23 वर्षे रा. संजीवनी नगर कांद्री कन्हान ता. पारशिवनी 2 ) विक्की उर्फ विडो राजु बोरकर वय 25 वर्षे रा. कामगार नगर कामठी यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्यांनी खापरखेडा वार्ड नं. 04 येथे चोरी केल्याची कबुली दिली त्यांचे ताब्यातुन पो. स्टे. खापरखेडा येथील गुन्ह्यात चोरी गेलेले संपुर्ण सोन्या चांदीचे दागीने हस्तगत करुन त्यांना अधिक विचारपुस केली असता त्यांनी पो. स्टे. कन्हान हद्दीत स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथील घरफोडी 2) पो. स्टे. रामटेक हद्दीत शबरी होटल चे मागे, पो. स्टे. पारशिवनी येथे करंभाड
तसेच पो. स्टे. खापा येथे खैरी पंजाब येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपी कडुन एकुण 5 घरफोडी उघडकीस आणल्या

सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी कन्हान विभाग कन्हान संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन खापरखेडा येथील ठानेदार धनाजी जळक यांचे नेतृत्वात पो. उपनिरीक्षक आरती नरोटे,पोलिस हवालदार प्रफुल राठोड, शैलेश यादव, राजु भोयर, मुकेश वाघाडे, पोलीस शिपाई राजकुमार सातुर मपोहवा कविता गोंडाने, यांचे पथकाने पार पाडली.



