
गोवंशाची तस्करी करणार्याच्या कुही पोलिसांनी आवळल्या मुसक्या,६ गोवंशाची केली सुटका….
कत्तलीकरीता जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्याच्या कुही पोलिसांनी आवळल्या मुसक्या,६ गोवंशाना दिले जिवनदान ९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
कुही(नागपुर)प्रतिनीधी – पोलिस अघिक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपुर शहरानजीकच्या परीसरातुन होणारी अवैध गोवंश वाहतुक व गोतस्करी यावर प्रतिबंध लावुन त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्या अनुषंगाने नागपुर शहरा लगतच्या महामार्गावर संबंधीत पोलिसांनी गस्त व पेट्रोलिंग वाढवुन कार्यवाही करत आहेत त्यानुसार दि ०१ मार्च रोजी कुही पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की,वेल्तुर ते कुही अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक होणार आहे.


मिळालेल्या माहीतीच्या आधारे कुही पोलिसांनी वेल्तुर ते कुही येथे मौजा वग फाट्यावर नाकाबंदी केली असता वाहन क्र एम. एच. ४० बी.जी. ९५६३ आणि वाहन क्र एम एच ४९ ए.टी ७६०३ हे दोन वाहन संशयीत रित्या जाताना दिसल्याने सदर वाहनास थांबवुन तपासणी केली असता,वाहन क्र एम एच ४० बी.जी ९५६३ मध्ये तीन बैल आणि वाहन के एम एच ४९ ए.टी ७६०३ मध्ये तीन बैल कुरतेने दोरीच्या साहयाने बांधुन, चारापाण्याची सोय न भरून नेताना मिळुन आले. वाहन कं एम. एच. ४० बी.जी. ९५६३ चा चालक आदित्य रविंद्र सोनसरे, रा. सिल्ली, ता. कुही जि नागपुर याला विचारपुस केली असता त्याने सदर वाहनाचे मालक रविंद्र गंगाधर सोनसरे, रा सिल्ली ता कुही, जि नागपुर हे असल्याची माहीती दिली. वाहन क्र एम एच ४९ ए.टी ७६०३ चा चालक रोहीत गजानन भिवगडे, रा. सिल्ली ता. कुही जि नागपुर याला वाहन मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने वाहन मालक संजय लांजेवार, रा सिल्ली, ता कुही, जि. नागपुर आहे अशी माहीती दिली.

तसेच दोन्ही चालकांनी सदर जनावरे ही रमजान शेख, मांढळ, ता कुही. जि नागपुर याने वाहनात भरून दिल्या बाबत माहीती दिली. पोलिसांनी चालक आरोपींच्या ताब्यातुन पंचासमक्ष १) वाहन क्र एम. एच. ४० बी.जी ९५६३ आणि त्यातील ३ बैल एकुण किंमत ४,७५,०००/- रू चा मुद्देमाल आणि २) वाहन कं एम. एच. ४९ ए.टी. ७६०३ आणि ३ बैल एकुण किंमती ४,९०,०००/- रू ची मुददेमाल असा दोन्ही वाहनासह ६ बैल असा एकुण ९,६५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच आरोपी १)आदित्य रविंद्र सोनसरे, रा. सिल्ली, ता. कुही जि नागपुर, २) रविंद्र गंगाधर सोनसरे, रा. सिल्ली, ता. कुही, जि नागपुर, ३. रोहीत गजानन भिवगडे, रा सिल्ली ता कुही जि नागपुर ४. संजय लांजेवार, रा सिल्ली, ता. कुही जि नागपुर, ५. रमजान शेख, मांढळ, ता कुही जि. नागपुर यांचेविरूद्ध कलम ११(१), ११ (१) (डी), (ई), (एफ) प्राण्यांचा छाळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, सहकलम ५(१),०९ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात अला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,उमरेड व्रुष्टी जैन यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर ठाणेदार पोलिस स्चेशन कुही याचे नेत्रुत्वात सफौ कुटे,नापोशि रोशन नवनाथे,पोशि रोशन मेश्राम यांनी केली


