
सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन,२१ मोटारसायकल जप्त करुन उघड केले अनेक गुन्हे…
मोटरसायकल चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,२१ मोटारसायकल सह १० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे प्रलंबित गुन्हे उघड करण्याबाबत आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास योग्य त्या सुचना देऊन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणनेकरीता रवाना केले


त्याअनुषंगाने दि(२१) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. मौदा परीसरात अप.क्र. २७२/२४ कलम ३७९ भादवि चे गुन्ह्यात आरोपी यांचे शोध घेत असता मुखबिरद्वारे खबर मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा मीनीमाता नगर नागपूर येथे राहणारा राहूल
ठाकरे आहे. यावर राहुल ठाकरे यास त्याचे घरातुन ताब्यात घेऊन सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने मौदा, तसेच नागपूर शहर, वर्धा, जवाहर नगर,मोर्शी येथून मोटारसायकली चोरून त्याचे मुळगावी सातनेर जि. बैतुल (मप्र) येथे त्याचा लहान भाऊ दिनेश सुखचंद खाकरे, वय ३७ वर्ष, रा. सातनेर त. आठनेर जि. बैतुल (म प्र ) याचे व त्याचा नातेवाईक राधेश्याम दुर्गाचरण हीडोडे, वय १९ वर्ष, रा. सातनेर त. आठनेर
जि. बैतुल (मप्र) मदतीने त्याचे मूळगावी व आजूबाजूच्या गावात विकल्याचे सांगितले.
राहुल सुखचंद ठाकरे, वय ४२ वर्ष, रा. मिनीमाता नगर नागपूर यास घेऊन त्याचे मूळगावी सातनेर जि. बैतुल (मप्र) येथे जाऊन तेथून दिनेश व राधेश्याम यास ताब्यात घेऊन त्याचे कडुन मौदा येथून चोरी गेलेल्या व नागपूर शहर, जवाहर नगर, वर्धा, मोर्शी, येथून चोरी
केलेल्या २१ वेगवेगळया कंपनीच्या मोटारसायकली एकूण किंमती १० लाख ३० हजार रुपये सर्व मोटारसायकली ताब्यात घेवून जप्त केल्या. गुन्हयातील सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासा करीता पोलिस स्टेशन मौदा यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर आरोपी यांचेकडुन खालील गुन्हे उघडकिस आणले
१) पो.स्टे. मौदा अप. क्र. १४ / २४ कलम ३७९ भादंवी.
२) पो.स्टे. मौदा अप. क्र. २७२ / २४ कलम ३७९ भादंवी.
तसेच पो.स्टे. वर्धा, पो.स्टे. जवाहर नगर, पो.स्टे. मोर्शी, पो. स्टे. कळमना, लकडगंज, MIDC गिट्टीखदान, नंदनवन, हिंगणा, बेलतरोडी, गणेशपेठ येथील १९ गुन्हे उघडकीस आणले.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोउपनि बट्टूलाल पांडे, सफौ नाना राऊत,पोहवा विनोद काळे, ईकबाल शेख, प्रमोद भोयर,नापोशि संजय बरोदीया, सायबरचे सतिश राठोड चापोहवा मोनू शुक्ला यांनी पार पाडली.


