
वाहनाच्या बॅटरी व साहीत्य चोरणारे चोरटे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
बॅटरी व वाहनाची साहीत्य चोरणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात…
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना सर्व पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दिनांक २१/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पथक रामटेक उपविभागात पो.स्टे. पारशिवनी हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय खबर मिळाली कि, पालोरा शिवारात ३ इसम विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर ट्रॅक्टरची स्टॉप लिंग पट्टी घेऊन जात आहे. या खबरे वरून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करून नाव गाव विचारले असता
सदर तिन्ही इसम हे विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समजले त्यांना सदर पट्टीबाबत विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तर दिल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी करंभाड शिवारातून बॅटरी, सोनेगाव तसेच टाऊन येथून ३ हायड्रॉलिक पट्ट्या, रॉड, स्टोपलिंग तसेच पीपला डाक बंगला शिवारातून १ बॅटरी चोरी करून विक्री केल्याचे सांगीतले. आरोपी सत्यम सुरेंद्र ठाकूर वय ३४ वर्ष रा. खापरखेडा त. सावनेर (कबाडी
दुकानदार) यास चोरी केलेले लोखंडी ट्रॅक्टरच्या हायड्रोलींक पट्ट्या विक्री केल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातून १) ५ बॅटरी किंमती २५००० /- रू. २) ३ हायड्रॉलिक पट्ट्या, रॉड, स्टोपलिंग २८५००/- रू. ३) विना क्रमांकाची हिरो कंपनीची सी डी डॉन मोटरसायकल किंमती १७०००/- रू. असा एकूण ७०,५००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे पारशिवनी यांचे ताब्यात देण्यात आला


त्यांना अधिक विचारपुस केली असता त्याचेकडुन खाली नमुद गुन्हे उघडकीस आणले
१) अप क्र. ३/२४ कलम ३७९ भादंवी २) अप. क्र. ८८ / २४ कलम ३७९ भादंवी ३)
अप. क्र. ९६/२४ कलम ३७९ भादंवी ४) पो. स्टे खापरखेडा अप. क्र. १७० / २४ कलम
३७९ भादंवि .
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेलकी, पोलिस हवालदार रोशन काळे, नितेश,पीपरोदे, उमेश फुलबेल, शंकर मडावी, पोलिस नायक वीरेंद्र नरड, विपीन गायधने चालक पोहवा अमोल कुथे स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी पार पाडली.



