
कत्तलीकरीता जनावरांची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात…
जनावरांची अवैधरीत्या कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्याविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैधरित्या होणार्या गोतस्करी विरोधात कडक कार्यवाही करण्याकरीता पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलिस स्टेशन कन्हान हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, कन्हान हद्दीत एक बारा चक्का ट्रक क्र. MP 19 HA1160 मधुन अवैधरित्या गोवंशीय जनावरे कोंबून कत्तलीकरिता घेऊन जात आहे.


अशा गोपनीय खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कन्हान येथे नाकाबंदी केली असता बारा चक्का ट्रक क्र. MP 19 HA1160 या ट्रकला थांबवुन सदर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये दोरीने क्रूररित्या बांधून भरलेले पांढऱ्या, लाल काळया, कोशा रंगाचे ३२ गौवंश जनावरे दाटीने निदर्यतेने कोंबुन चारापाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना दोरीने बांधुन वाहतुक करतांना मिळुन आले

यावरुन सदर ठिकाणावरुन १) पांढऱ्या, लाल काळया, कोशा रंगाचे ३२ गौवंश असे एकूण ३२ गोवंश, किंमती ६,४०,०००/- रू. (२) बारा चक्का ट्रक क्र. MP 19 HA1160 किं अं २०,००,०००/-रू. (३) दोन मोबाईल किमती ११,०००/- रु असा एकूण २६,५१,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त केला. पीडित जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गौशाळा खरबी भंडारा येथे दाखल करण्यात आलेले आहे.

तसेच यातील आरोपी १) मोहमद हुशेन शमीम कुरेशी वय २४ वर्ष, २) प्रकाश रामचरण करोशिया वय ४४ वर्ष दोन्ही रा. दामोह म.प्र., पाहिजे आरोपी (३) गोंवश मालक संतु रा इमलिया दामोह, मप्र. ४) फेजुल रा. नागपूर ५) नादिर रा. मनसर यांचे विरुध्द पोस्टे कन्हान येथे कलम ११(१) (अ), (ड), (फ) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधि.१९६० सहकलम ५(१), (२), ९ महाराष्ट्र प्राणी सरक्षण अधि. सहकलम ३(१)/१८१ मोवाका. सहकलम ४९, ३(५) बीएनएस अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमाल व आरोपी क्र. १ ते २ यांना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक धुमाळ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक किशोर शेरकी,सफौ विनोद काळे,पोहवा प्रमोद भोयर, किशोर वानखेडे,नापोशि संजय बरोदीया,


