गावठी मोहादारु निर्मीती अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन बुट्टीबोरी हद्दीत धवलपेठ पारधी बेड्यावर अवैधरित्या मोहाफुलाची गावठी दारू गाळणाऱ्यावर छापा कार्यवाही…..

बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.३०/०९/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस ठाणे बोरी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मौजा धवलपेठ येथील पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर अवैधरित्या गावठी मोहा दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली





त्यावरुन पोलिस स्टेशन बोरी हद्दीत मौजा धवलपेठ येथील पारधी बेडा येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी पद्धतीने हातभट्टी वर छापा टाकला असता त्याठिकाणी मोहाफुलाची गावठी दारू गाळणाऱ्या एकूण ३ इसमांवर कार्यवाही करण्यात आली तसेच अवैधरित्या गावठी पद्धतीने हातभट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे आरोपी १) प्रकाश उजा काळे २) देवा कन्हैयागिरी चव्हान रा आसोला व १ महिला आरोपी यांचे ताब्यातून मोहाफुल गावठी दारू १०० लिटर एकूण किंमती ५०००/- रू चा तसेच ८ प्लास्टीक डूम मध्ये मोहाफुल उकडता रासायनिक सडवा २०० लीटर किंमती ३२०००/- रु तसेच मोहाफुल दारू काढण्याचे इतर साहित्य ड्रम, लाकूड इत्यादी मिळून किमती ७०००/- रु असा एकुण ४४०००/- रू वे मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.



जप्त मुद्देमाल व कागदपत्र पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलिस ठाणे बुट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले असुन आरोपी क्र २ चे ताब्यातुन प्लास्टीक डबकीतुन ५० लीटर मोहाफुल गावठी दारू कि २५००/- रू ६ प्लॉस्टीक ड्रममध्ये १२०० लीटर मोहाफुल दारू सडवा किमत २४०००/- रू व दारू गाळण्याचे इतर साहीत्य ५०००/- रू असा एकुण ३१५००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महीला आरोपी यांचे ताब्यातुन ७ प्लॉस्टीक डबकीमध्ये ७० लीटर मोहाफुल गावठी दारू कि ३५००/- रू तसेच १२ प्लॉस्टीक व लोखंडी ड्रम मध्ये २०० लीटर मोहाफुल रासायनिक सडवा किमती ४८०००/- रू इतर दारू गाळण्याचे साहीत्य कि ८०००/- असा एकुण ५९,७००/- रू चा माल जप्त करण्यात आला.



सदर तिन्ही कारवाई दरम्यान एकुण १३५२००/- रू चा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला. नमुद ३ आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बोरी येथे कलम ६५ (बी), (सी), (ई), (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ओमप्रकाश कोकाटे  यांचे मार्गदर्शनात सपोनि मनोज गदादे, जिवन राजगुरू, सफौ मिलिंद नांदुरकर, विनोद काळे, पोहवा संजय बांते, चापोहवा मुकेश शुक्ला, चापोशी आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!