
मौदा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,८ जुगारीसह मुद्देमाल हस्तगत…
मौदा पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा,८ जुगांरीसह ७.५७ हजार रु चा मुद्देमाल जप्त….
मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजा दिघोरी शेत शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून ताशपत्त्यावर पैशांची बाजी लाऊन हारजितचा जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करून दुचाकी, मारोती स्विफ्ट कार, मोबाईल, आणि नगदी असा एकूण ७ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.


कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार (दि.१८ऑगस्ट) रोजीचे सायंकाळी ०५:०० वा. ते ०६:०० वा. दरम्यान पोलिस स्टेशन मौदा हद्दित पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मौजा दिघोरी काळे शेत शिवारात काही ईसम हे ५२ ताशपत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळत आहे. अशा माहितीवरुन दिघोरी काळे शेत शिवारात काही ईसम हे पडीक शेतात तासपत्त्यावर जुगार खेळतांना दिसले. यावरुन त्यांना घेराव टाकुन पकडण्याचा प्रयत्न करीत असतांना काही ईसम मौक्कावरुन पळुन गेले

त्यातील काही अनुक्रमे १) जितेन्द्र मोरेश्वर कुडे, (वय २५ वर्षे), रा.प्लॉट नं.२०६६, पारडी पोलीस ट्राफीक चौकी जवळ, पारडी नागपुर, २) सुरज रवीकर नारनवरे, (वय २४ वर्षे), रा.प्लॉट नं. ५७, घटाटे नगर, पारडी, नागपुर, ३) हरीष रामदास मेहत्रे, (वय २३ वर्षे), रा.प्लॉट नं. ५३, भवानी नगर, पारडी, नागपुर, ४) अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार, (वय ३९ वर्षे), रा.प्लॉट नं. ८१, गंगाबाग, पारडी, नागपुर, ५) सागर सुधाकर महल्ले, (वय ३२ वर्षे), प्लॉट नं.११९, भवानी नगर, पारडी, नागपुर, ६) चेतन अशोकरावजी भुरके, (वय ३० वर्षे), पारडी पोलीस ट्राफीक चौकी जवळ, पारडी, नागपुर ७) रोहीत तेजराम सिन्हा, (वय २४ वर्षे), रा. प्लॉट नं.१४५, पुनापुर रोड, गंगाबाग, पारडी, नागपूर, ८) विनय तंबी मुदलीयार, (वय २५ वर्षे), रा.प्लॉट नं. १, सुभाष मैदान, टालपुरा, पारडी, नागपुर यांना मौक्कावरुन ताब्यात घेतले.

घटणास्थळावरुन १) हिरो होंडा सी.डी. डॉन मो.सा. क्र. MH 31/BY-0059 २) हिरो होंडा पॅशन मो.सा. क्र. MH-40/U-2508 ३) हिरो पेंशन मो.सा.क्र. MH-49/AN- 7609 ४) होन्डा अॅक्टीव्हा क्र. MH-31/DN-9061 ५) टिव्हीएस ज्युपीटर क्र. MH-49/BT-3617 ६) हिरो स्प्लेंन्डर मो.सा. क्र. MH-49/AX-7145 ७) मारोती स्विफ्ट कार क्र. MH-49/AT-4678 मिळुन आल्या. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे अंगझडती व डावावर मांडलेले नगदी ६,९१०/- रु. तसेच मोबाईल कि. ७३,०००/- रु. व वाहन कि. ६,७८,०००/-रु. असा एकुण ७,५७,९१०/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद सर्व आरोपीविरुद्ध पोस्टे मौदा येथे अप क्र. ८०५/२०२४ कलम १२ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,कन्हान यांचे मार्गदर्शनात प्रमोद घोंगे पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन मौदा यांचे सोबत सपोनि मनोज चौधरी, पोउपनि महेश बोथले, पोहवा. संदीप कडु, राजु आंधळे, गणेश मुदमाळी, रुपेश महादुले, प्रकाश गाठे, पोना. दिपक दरोडे, तुषार कुडुपले, पोशि. नितीन सार्वे, आतिश गाढवे यांनी केली आहे.


