
MIDC बुटीबोरी पोलिस अवघ्या १२ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा….
MIDC बुट्टीबोरी परीसरातील कंपनीमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा MIDC बुट्टीबोरी पोलीसांनी अवघ्या १२ तासाचे आत केला उघड…
बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील
फिर्यादी हरीशंकर रामसुरत पांडे, वय ४७ वर्षे, रा. नागपुर यांनी पोलिस स्टेशन येथे येवुन तक्रार दिली की , ते MIDC बुट्टीबोरी परीसरामध्ये असलेल्या करमतारा इंजिनियरींग कंपनी येथे HR या पदावर कार्यरत आहेत. दि.(४) रोजी सकाळी ०९.०० वा. पासुन ते कर्तव्यावर हजर होते. नेहमीप्रमाणे सायंकाळी ते काम संपल्यावर कंपनीमधुन घरी निघुन गेले. कंपनीमधुन जातेवेळी त्यांनी कंपनीमध्ये असलेल्या इलेक्ट्रोप्लेट विभागामध्ये प्लास्टीकच्या ११ पोत्यांमध्ये अंदाजे ३०० किलो लोखंडी वायसर भरुन ठेवले होते.


दुसर्या दिवशी सकाळी ०५/०५/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. फिर्यादी हे घरी हजर असताना त्यांना कंपनीमधील सुरक्षारक्षक याने फोन करुन कळविले की इलेक्ट्रोप्लेट विभागात ठेवलेले ११ गोण्यांमधील ३०० किलो लोखंडी वायसर दिसुन येत नाही. ते कोणीतरी चोरुन नेले आहे. त्यानंतर फिर्यादी यांनी कंपनीमध्ये जावुन पाहिले असता कंपनीमध्ये असलेल्या इलेक्ट्रोप्लेट विभागामध्ये प्लास्टीकच्या ११ पोत्यांमध्ये अंदाजे ३०० किलो लोखंडी वायसर किंमती ४०,००० /- रु कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी
चोरुन नेल्याची खात्री झाल्यानंतर ते पोलिस स्टेशन MIDC बुटीबोरी येथे येऊन त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सुरु करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे उद्देशाने पोलिस स्टेशन MIDC बुट्टीबोरी येथील अधिकारी यांनी पोलिस स्टेशन परीसरामध्ये आरोपी व गेलेल्या मालाचा शोध सुरु केला असता गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम हे मोटारसायकलने MIDC बुट्टीबोरी परीसरात फिरत असुन त्यांचेकडे असलेले लोखंडी सामान ते विकण्याच्या तयारीत आहेत अशी खात्रीशिर माहिती प्राप्त झाली त्यावरुन दोन्ही इसमांचा शोध घेण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग सुरु असताना दोन इसम हे दोन मोटारसायकलसह MIDC बुट्टीबोरी परीसरात मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन विचारपूस
केली असता त्यांनी करमतारा इंजिनियरींग मधुन लोखंडी वायसर चोरी केल्याची कबुली दिली.

त्यांचेकडे असलेल्या मोटारसायकलबाबत त्यांना विचारले असता त्या देखील चोरीच्या असल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे १) महेश चंद्रभान टेकाम, वय ४० वर्षे, रा. आमगाव, जि. वर्धा २) किशोर मारोती गुंजेकर, वय २८ वर्षे, रा. गिरोली वस्ती, ता. जि. भंडारा अशी असुन त्यांचे ताब्यातुन १) ०८ पोत्यांमध्ये असलेले ३०० किलो लोखंडी वायसर किंमती ४०,००० /- रु. २) जुनी वापरती पल्सर मोटारसायकल क्रमांक MH-32/AE-9717 किंमत ४०,०००/- रु ३) जुनी वापरती हिरो होंडा सिडी डिलक्स क्रमांक MH-31 / DG – 3917 किंमत ३५,०००/- रु
असा एकुण १,१५,०००/- रु. चोरीचा माल त्यांचे ताब्यातुन जप्त केला. सदर गुन्हयातील आरोपी यांना अटक केली असुन त्यांचेकडुन जप्त केलेल्या मोटारसायकलबाबत अधिक माहिती प्राप्त करुन गुन्हयाचा तपास करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सहा. पो. नि राजीव कर्मलवार, पोउपनि सुशिल सरकार, राम खोत, पोलिस अंमलदार अरुण जयसिंगपुरे, लक्ष्मण बन्ने, संतोष तिवारी, पुजा इंगळे, श्रीकांत गौरकार, विनायक सातव, दिलीप नवले, विशाल डेरकर, उज्वल कोठे यांनी केली.


