
अट्टल दुचाकी चोरट्यास बुटीबोरी पोलिसांनी केले जेरबंद…
अट्टल मोटार सायकल चोरट्यांना बुट्टीबोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन चोरीच्या दुचाकी केल्या हस्तगत….
बुटीबोरी(नागपुर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी कैलास दिलीपराव भूते, वय ३४ वर्ष, रा. प्लॉट नं. १४ टिपले ले आऊट लांबट लॉन जवळ खरबी ता. जि. नागपुर हे दि. २४/०५/२४ रोजी संध्या ७.०० वा. दरम्याण त्यांचा मित्र आदित्य खोब्रागडे याचा वाढदिवस असल्याने स्वताची होंडा अॅक्टीव्हा मोपेड क्र. एम एच ४९ बीएच ९५४८ किमती ५०.०००/- रु. ने बुटीबोरी येथे आले होते वाढदिवस आटोपल्यावर जेवन झाल्यावर मित्र आपल्या घरी गेले व रात्र जास्त झाल्याने फियांदी यांनी आपली मोपेड गाडी बुटीबोरी मेन रोड येथे एकनाथ मामा कटींग दुकान समोर लावून
तिथे असलेल्या खुर्चीवर झोपी गेले परंतु दि २५.०५.२४ चे सकाळी ०६.३० वा दरम्यान उठुन पाहीले असता त्यांना त्याची होंड़ा अॅक्टीव्हा मोपेड क्र एम एच ४९ बीएच ९५४८ किंमती ५०,००० रु. ची ही दिसली नाही ती कुणी तरी अज्ञात चोराने दिनांक २४.०५.२४ चे १०.३० ते २५.०५.२४ चे ०५.३० वा. दरम्यान चोरून नेली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोस्टे बुटीबोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.


सदर गुन्हयाचे तपासामध्ये अनोळखी आरोपीचा शोध घेणे कामी वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हयाचे तपासकामी विशेष पथकाची नेमनुक करून अनोळखी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. असता पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय खबरी द्वारे गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असतांना मुखबीर द्वारे मिळालेल्या माहीती वरूण हिंगणघाट जि वर्धा येथुन १) सदर गुन्हयाचे तपास करीत नमूद अटक आरोपी १) यश विठ्ठल ठाकरे वय १९ वर्ष रा संत तुकडोजी वार्ड निखाडे ने आऊट हिंगणघाट ता वर्षा २) सम्राट पढरी धोटे वय १९ वर्ष रा. शंभरकर संत तुकडोजी पार्क बौध्द विहार जवळ हिंगणघाट यास गुन्हयासंबंधाने विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली यावरून नमुद आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली सदर आरोपी यांच्याकडुन होंडा अॅक्टीचा मोपेड गाडी क एम एच ४९ बीएच ९५४८ किंमती ५०.०००/- व गुन्हयात वापरण्यात आलेली हिरो कंपनीची नंबर नसलेली मोपेड़ कि १००००/- २ मोपेड़ कि
१,२०,००० /- रू चा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश घुमाल उपविभागीय पोलिस अधिकारी,नागपुर पुजा गायकवाड ,पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे
मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अधिकारी सपोनी प्रशांत लभाणे, पो हवा आशिष टेकाम,युनूस खान, कुणाल पालदी, पोशि आशिष कछवाह,माधव गुट्टे यांनी केली असुन सदर
गुन्हयाचा पुढील तपास पो हवा आशिष टेकाम पो स्टे बुटीबोरी हे करीत आहे.



